शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

"ट्रम्प जे अमेरिकेत करतायेत, तेच काम त्यांचे मित्र मोदी भारतात करतायेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2021 12:41 PM

digvijay singh : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत जे करत आहेत, तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात करत आहेत, असा टोला दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.

ठळक मुद्देडोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत म्हणजेच कॅपिटल बिल्डिंगबाहेर गर्दी करुन जोरदार गोंधळ घातला. या घटनेचे पडसाद जगभरात उमटले असून यावर जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालानंतरही राजकीय तणाव सुरु आहे. निवडणूक निकालात फेरफार झाल्याचा आरोप करत अमेरिकचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत म्हणजेच कॅपिटल बिल्डिंगबाहेर गर्दी करुन जोरदार गोंधळ घातला. 

या घटनेचे पडसाद जगभरात उमटले असून यावर जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यावर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी भाष्य केले आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत जे करत आहेत, तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात करत आहेत, असा टोला दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या ट्विटला रिट्विट करत दिग्विजय सिंह म्हणाले, " बिल क्लिंटन, आम्ही तुमचे विचार शेअर करतो. ट्रम्प अमेरिकेत जे काय करत आहेत, तेच त्यांचे मित्र मोदी भारतात करत आहेत. भारतीय लोकांचे विभाजन आणि भारतीय राज्यघटना बिघडवण्याचा त्यांचा हेतू आहे."

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत इलेक्टोरल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती. बैठकीत जो बायडेन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले, परिणामी संसदेचे कामकाज थांबवावे लागले. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगबाहेर गोंधळही घातला. या घटनेवर देशभरात टीका केली जात आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, "सत्तांतर शांततेत व्हायला हवे..."भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेवर भाष्य केले असून हिंसाचाराच्या बातम्या पाहून आपण अस्वस्थ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात नरेंद्र मोदींनी ट्विट केले आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, "वॉशिंग्टन डीसीमध्ये दंगल आणि हिंसाचाराबाबतच्या बातम्या पाहून अस्वस्थ झाले. व्यवस्थित आणि शांततेत सत्ता हस्तांतरण व्हायला पाहिजे. बेकायदेशीर निषेधाच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेला डाग लागू दिला जाऊ शकत नाही."

ट्रम्प यांचे समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहनडोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे. आपल्या समर्थकांना शांततेत निषेध करण्याचे आवाहन करीत ट्रम्प म्हणाले की, आंदोलनात कोणतीही हिंसाचार होऊ नये. लक्षात ठेवा आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा पक्षात आहोत.

ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट लॉकनियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरने अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट १२ तासांसाठी, तर फेसबुकने २४ तासांसाठी लॉक केले आहे."वॉशिंग्टन डीसीमध्ये उद्भवलेल्या हिंसक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे तिन ट्वीट्स हटवावेत, अशी आमची मागणी आहे. नागरी अखंडत्व धोरणाचे वारंवार आणि गंभीर उल्लंघन त्यांनी केले आहे," असे ट्विटरने म्हटले आहे. ट्विट्स न हटवल्यास डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट लॉक राहील, असेही ट्विटरने स्पष्ट केले आहे.

फेसबुकने हटविला ट्रम्प यांचा व्हिडीओट्विटरनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ फेसबुकने डिलीट केला. दरम्यान, अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले होते. "आम्ही ट्रम्प यांचा व्हिडिओ हटविला आहे, कारण ट्रम्प यांचा व्हिडिओ सुरु असलेल्या हिंसाचार कमी करण्याऐवजी प्रोत्साहन देत होता," असे फेसबुकचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंटीग्रिटी गाय रोसेन यांनी म्हटले आहे.

...हा देशद्रोह आहे - जो बायडेननवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले जो बायडेन (Joe Biden) यांनी  ट्रम्प यांना संविधानाची सुरक्षा करण्याचे आवाहन केले आहे. "मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी आपली शपथ पूर्ण करण्यासाठी तात्काळ राष्ट्रीय प्रसारमाध्यमावर जावे आणि संविधानाची सुरक्षा करावी आणि हे सर्व थांबवावे", असे जो बायडेन म्हणाले. याचबरोबर, कॅपिटल बिल्डिंगमध्ये जो गोंधळ आपण पाहिला आहे, ते आम्ही नाही आहोत. ही कायदा न मानणाऱ्या लोकांची खूप कमी संख्या आहे. हा देशद्रोह आहे, असे जो बायडेन यांनी सांगितले.

 

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन