नाैदलाला अमेरिका देणार एफ-१८ विमाने, मारक क्षमता वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 04:21 AM2020-10-29T04:21:45+5:302020-10-29T04:23:11+5:30

F 18 Plane News : एफ-१८ लढाऊ विमानांच्या समावेशामुळे नौदलाची मारकक्षमता वाढणार आहे.

US to supply F-18s to Indian Navy | नाैदलाला अमेरिका देणार एफ-१८ विमाने, मारक क्षमता वाढणार

नाैदलाला अमेरिका देणार एफ-१८ विमाने, मारक क्षमता वाढणार

Next

नवी दिल्ली - भारत आणि अमेरिका यांच्यात मंगळवारी बेसिक एक्स्चेंज अँड को-ऑपरेशन मॅॅनेजमेंट (बेका) हा महत्त्वाचा करार झाला. या करारांतर्गत भारताला मोठ्या प्रमाणात संरक्षण साहित्य पुरवण्याची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेेने आता भारतीय नौदलाला एफ-१८ ही लढाऊ विमाने देऊ केली आहेत. उल्लेखनीय म्हणजे नौदलाने काही वर्षांपूर्वी ५७ एफ-१८ लढाऊ विमानांची मागणी केली होती. एफ-१८ लढाऊ विमानांच्या समावेशामुळे नौदलाची मारकक्षमता वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ या एफ-१८ लढाऊ विमानांची माहिती...

 दोन आसनी, सुपरसॉनिक, सर्व प्रकारच्या हवामानात टिकाव धरणारे आणि अस्त्रे वाहून नेण्याची क्षमता. 
 सर्व प्रकारची अस्त्रे एफ-१८ वर तैनात करता येऊ शकतात.
 प्रचंड वेगाने लक्ष्यभेद करण्याची क्षमता. 
विमानाचा सर्वोच्च वेग 1,915 कि.मी. प्रति तास. 
 फायटर एस्कॉर्ट, फ्लीट एअर डिफेन्स, शत्रूचे हवाई संरक्षण छेदणे, हवाई टेहळणी अशी विविधांगी भूमिका निभावण्यास सक्षम. 
 इंजिनाचे प्रकार - टर्बोफॅॅन, जनरल इलेक्ट्रिक एफ-४०४.
 मॅॅकडोनेल डग्लस (आता बोइंगचा भाग) आणि नॉर्थरॉप (आता नॉर्थरॉप ग्रुमन यांचा भाग) यांनी या विमानाची रचना केली आहे.

 

Web Title: US to supply F-18s to Indian Navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.