शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

भारतासाठी अमेरिकेची ३० हजार अब्ज डॉलरची बाजारपेठ खुली; करारामुळे भारताला काय फायदा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 06:35 IST

व्यापार कराराचा अंतरिम आराखडा निश्चित; शनिवारपासूनच अंमलबजावणी सुरू, भारतावरील अतिरिक्त शुल्कही रद्द, वस्त्रोद्योगापासून औषध निर्मिती क्षेत्रांना बूस्ट

दिल्ली/ नवी वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिका यांच्यात शनिवारी अंतरिम व्यापार करारासाठी एका आराखड्यावर सहमती झाली. या करारामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी अनेक वस्तूंवरील आयात शुल्कात कपात केली जाणार आहे. या करारानुसार, अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील सध्या लावलेले ५० टक्के शुल्क कमी करून ते १८ टक्क्यांवर आणले आहे, तर भारताने सर्व अमेरिकी औद्योगिक वस्तू आणि अन्न व कृषी उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीवर आयात शुल्क पूर्णपणे रद्द किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात भरड धान्य, पशुखाद्यासाठी लाल ज्वारी, सुका मेवा, ताजी व प्रक्रिया केलेली फळे, सोयाबीन तेल, मद्य, स्पिरिट यांचा समावेश आहे.

दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनानुसार भारताने पुढील पाच वर्षात ५०० अब्ज डॉलर किमतीची अमेरिकी ऊर्जा उत्पादने, विमाने आणि त्यांचे सुटे भाग, मौल्यवान धातू, तंत्रज्ञान उत्पादने आणि कोकिंग कोल खरेदी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. या करारामुळे भारतीय निर्यातदारांसाठी हा मोठा दिलासा असून ७ फेब्रुवारी २०२६ नंतर आता त्यांची उत्पादने अमेरिकी बाजारपेठेत २५ टक्क्यांनी स्वस्त होतील

ट्रम्प यांच्या आदेशावर स्वाक्षऱ्या

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी एका कार्यकारी आदेशाद्वारे, रशियाकडून होणाऱ्या तेलाच्या खरेदीवरून गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतावर लादलेले २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क हटवले. भारताने तेल खरेदी बंद करण्याच्या दिशेने अनेक महत्त्वाची पावले उचलली असून, त्यांनी रशियाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तेल आयात बंद करण्याची वचनबद्धता दर्शवली आहे, असे ट्रम्प म्हणाले.

भारताचा फायदा

वस्त्रोद्योग : कपडे आणि तयार कापड अमेरिकेत स्वस्त मिळतील, त्यामुळे मागणी वाढेल.औषध निर्मिती : जेनेरिक औषधांवरील कर शून्य झाल्यामुळे भारतीय औषध कंपन्यांना मोठी बाजारपेठ मिळेल.हस्तशिल्प : भारतीय कारागिरांनी बनवलेल्या वस्तूंना तिथे चांगली किंमत मिळेल.रत्ने आणि दागिने : हिरे आणि दागिन्यांची निर्यात वाढेल.चर्मोद्योग : चामड्याच्या वस्तू आणि पादत्राणे.

अमेरिकेचा फायदा

शेती आणि पशुखाद्य : अमेरिकी कापूस, बदाम, अक्रोड आणि विशेषतः पशुखाद्यासाठी लागणारी लाल ज्वारी भारतात स्वस्त येईल.तंत्रज्ञान : अमेरिकन कंपन्यांचे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट आणि डेटा सेंटरसाठी लागणारी उपकरणे भारतात अधिक प्रमाणात विकली जातील.ऊर्जा क्षेत्र : भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल व कोळसा खरेदी करील.फायदा होणारी प्रमुख क्षेत्रे : वस्त्रोद्योग आणि कपडे, चामडे आणि पादत्राणे, प्लास्टिक आणि रबर, सेंद्रिय रसायने, गृहसजावट, जेनेरिक औषधी, रत्ने आणि हिरे (शुल्क शून्य होईल).

भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचे पूर्ण होणार संरक्षण

पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले की, हा करार करताना भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचे पूर्ण रक्षण करण्यात आले आहे. मका, गहू, तांदूळ, सोया, कुक्कुटपालन, दूध, पनीर, इथेनॉल आणि तंबाखू यांसारख्या संवेदनशील कृषी उत्पादनांना या सवलतींमधून बाहेर ठेवून पूर्णपणे संरक्षित केले आहे.

'मेक इन इंडिया'ला मिळणार बळहा अंतरिम व्यापार करार शेतकरी आणि उद्योजकांसाठी नवीन संधी निर्माण करून 'मेक इन इंडिया' मोहिमेला बळ देईल आणि महिला व तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करील. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अमेरिकेच्या शुल्कात झालेल्या मोठ्या कपातीमुळे भारतीय निर्यातदार, विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, शेतकरी आणि मच्छीमारांसाठी ३० हजार अब्ज अमेरिकी डॉलरची अवाढव्य बाजारपेठ खुली होईल. - पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : US market opens for India: Trade deal benefits explained.

Web Summary : India and US agree on trade deal, cutting tariffs on goods. India will buy energy, planes and metals. Textile, pharma, and handicrafts benefit. Farmers protected.
टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प