शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अमेरिका, मेक्सिको, कॅनडा संयुक्तपणे भूषवणार 2026च्या फिफा वर्ल्ड कपचं यजमानपद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 5:31 PM

मोरोक्कोला मागे टाकत मिळवली यजमानपद भूषवण्याची संधी

मॉस्को: तब्बल 32 वर्षांनंतर उत्तर अमेरिकेत फिफा वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे. 2026 च्या वर्ल्ड कपच्या यजमानपदाची संधी मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेला देण्यात आली आहे. आफ्रिकेतील मोरोक्कोदेखील वर्ल्ड कप यजमानपदाच्या शर्यतीत होता. मात्र मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेनं मोरोक्कोला मागे टाकत फिफा वर्ल्ड कपचं यजमानपद पटकावलं. फिफा वर्ल्ड कप 2026 चं आयोजनाचं यजमानपद कोणाला मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यासाठी 203 देशांनी मतदान केलं. यानंतर फिफाचे अध्यक्ष जिआनी इन्फेंटिनो यांनी विजेत्यांची घोषणा केली. या कार्यक्रमाला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन काही वेळ उपस्थित होते. 2026 मध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपच्या यजमानपदासाठी झालेल्या मतदानात मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेला 134 मतं मिळाली. तर मोरोक्कोला केवळ 65 मतं मिळाली. याआधी उत्तर अमेरिकेनं तीनवेळा फिफा वर्ल्ड कपचं यजमानपद भूषवलं आहे. तर आफ्रिकेनं एकदा स्पर्धेचं आयोजन केलं आहे. अमेरिकेनं 1994 मध्ये फिफा वर्ल्ड कपचं यजमानपद भूषवलं होतं. त्यावेळी पहिल्यांदाच अमेरिकन संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. यंदाच्या वर्ल्ड कपला उद्यापासून सुरुवात होत आहे. 15 जूनला वर्ल्ड कपचा अंतिम सामना होईल. तर पुढील वर्ल्ड कपचं यजमानपद कतार भूषवणार आहे.   

टॅग्स :FootballफुटबॉलFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८