नवी दिल्ली - मध्य पूर्वेतील युद्ध थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम करण्याची घोषणा केली असली तरी इराणकडून येणारी प्रतिक्रिया पाहता संघर्ष बंद होण्याची शक्यता कमी आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याचे वृत्त समोर आले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मध्य पूर्वेतील परिस्थितीवर चर्चा झाली. त्याशिवाय स्ट्रेट होर्मुझ खुला करण्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. अमेरिका-इस्रायल यांनी इराणवर हल्ला केल्यानंतर इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. इराणकडून सातत्याने आखाती देशांवरही हल्ले करण्यात आले. त्यात भारताने या सर्व परिस्थितीत शांतता आणि चर्चेची भूमिका घेतली होती. त्यामुळे ट्रम्प आणि मोदी यांच्यातील फोन संवाद महत्त्वाचा असल्याचं बोलले जाते.
२८ फेब्रुवारीला इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या हल्ल्याने बिथरलेल्या इराणने आखाती देशांमधील अमेरिकन सैन्य तळांवर टार्गेट हल्ले केले. त्याशिवाय स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील जल वाहतूकही रोखून धरली. त्यामुळे जगात तेल आणि गॅसचा तुटवडा जाणवू लागला. जागतिक बाजारात तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या. या सगळ्यात सुरुवातीला आक्रमक असलेल्या अमेरिकेने नरमाईची भूमिका घेत ५ दिवसांसाठी युद्धबंदीची घोषणा केली. मात्र हे युद्ध थांबवण्याची इराणची मानसिकता नाही. त्यात या युद्धात पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे.
भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिया गोर यांनी एक्सवर याबाबत माहिती दिली आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. मध्य पूर्वेतील परिस्थितीवर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यात स्ट्रेट होर्मुझ खुला करण्याचा महत्त्वाचा मुद्दाही समाविष्ट होता. आज संसदेत मोदींनी मध्य पूर्वेतील युद्धावरून जगाला शांततेचा संदेश दिला. सर्व देशांनी शांततापणे तोडगा काढण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. जर हा संघर्ष दीर्घकाळ चालला तर त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. त्यामुळे भारत या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे अशी माहिती पंतप्रधानांनी संसदेत दिली.
संघर्ष रोखण्यासाठी ट्रम्प यांचा पुढाकार
मध्य पूर्वेतील संघर्ष कमी करण्याच्या दिशेने डोनाल्ड ट्रम्प पाऊल टाकत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात २८ फेब्रुवारीला चर्चा फिस्कटली होती त्यानंतर अमेरिका इस्रायलने मिळून इराणवर सैन्य कारवाई केली. या संघर्षात आतापर्यंत १५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलसह आखाती देशांनाही टार्गेट केले. त्यामुळे हे युद्ध मध्य पूर्वेत भडकले. त्यात स्ट्रेट होर्मुझमधील जल वाहतूक विस्कळीत झाल्याने जागतिक ऊर्जा संकट उद्भवले. त्यामुळे ट्रम्प यांच्यावरील दबाव वाढला आहे. त्यामुळे इराणसोबत नव्याने चर्चेसाठी अमेरिका प्रयत्नशील असून चर्चेतून या युद्धावर तोडगा काढण्यासाठी ट्रम्प हालचाली करत आहेत. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ट्रम्प यांनी साधलेला संवाद याच दिशेने आणखी एक पाऊल आहे का हे पाहणे गरजेचे आहे.
Web Summary : Amidst Middle East conflict, Trump phoned Modi to discuss the situation and Strait of Hormuz. Iran's actions and global energy crisis are concerning. Modi emphasized peace and dialogue in parliament, noting India's active role in de-escalation efforts.
Web Summary : मध्य पूर्व संघर्ष के बीच, ट्रम्प ने मोदी को फोन करके स्थिति और होर्मुज जलडमरूमध्य पर चर्चा की। ईरान की कार्रवाइयां और वैश्विक ऊर्जा संकट चिंताजनक हैं। मोदी ने संसद में शांति और बातचीत पर जोर दिया, और भारत की सक्रिय भूमिका पर प्रकाश डाला।