Mukesh Ambani: 'अमेरिका-चीन, तो दिवस दूर नाही...'; मुकेश अंबानींची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 09:27 PM2021-07-24T21:27:00+5:302021-07-24T21:27:38+5:30

we will stand with america and china in 2047.: Mukesh Ambani 991 मध्ये आपल्या अर्थव्य़वस्थेमध्ये अनेक त्रुटी होत्या. आज मोठ्या प्रमाणावर क्रांती झाली आहे. आता भारताला 2051 पर्यंत सर्वांसाठी समान समृद्धी देणारी अर्थ्यव्यवस्थेत ते रुपांतरीत करायचे आहे, असे मुकेश अंबानी म्हणाले.

'US-China, that day is not far away ...'; Mukesh Ambani's big prediction on India's 100th independence anniversary | Mukesh Ambani: 'अमेरिका-चीन, तो दिवस दूर नाही...'; मुकेश अंबानींची मोठी भविष्यवाणी

Mukesh Ambani: 'अमेरिका-चीन, तो दिवस दूर नाही...'; मुकेश अंबानींची मोठी भविष्यवाणी

Next

economic reforms 30 years celebration:" भारतामध्ये आर्थिक उदारीकरण (economic reforms) सुरु होऊन 30 वर्षे झाली आहेत. 1991 मध्ये सुरु झालेल्या उदारमतवादी धोरणामुळे देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिक बदल झाले आहेत. उदारीकरणाला 30 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani ) याांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. एका लेखात त्यांनी हे म्हटले आहे. (the centenary of our Independence in 2047 by making India one of the world’s three wealthiest nations)

Mukesh Ambani: मुकेश अंबानींना आणखी मालामाल करणार हा नवा उद्योग; अमेरिकन फर्मची भविष्यवाणी

जेव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा अमेरिका आणि भारत एकाच पायरीवर उभे असणार आहेत. अंबानी यांनी ईटीमध्ये हा लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी 1991 मधील अर्थव्यवस्था आणि 2021 मधील अर्थव्यवस्थेची तुलना केली आहे. 1991 मध्ये आपल्या अर्थव्य़वस्थेमध्ये अनेक त्रुटी होत्या. आज मोठ्या प्रमाणावर क्रांती झाली आहे. आता भारताला 2051 पर्यंत सर्वांसाठी समान समृद्धी देणारी अर्थ्यव्यवस्थेत ते रुपांतरीत करायचे आहे. आता इक्विटी आपल्या सामुहिक समृद्धीच्या केंद्रस्थानी असणार आहे. 

आपले वडील धीरुभाई अंबानी हे आर्थिक उदारीकरणाच्या बाजुने होते. 1980 च्या दशकात या उदारीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात इतरांसारखेच एक स्तंभ होते. छोटा विचार करणे एका भारतीयासाठी शोभणारे नाही, असे ते म्हणत. गेल्या तीन दशकांत आपण मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळविला आहे. देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा 100 वर्षे होतील, म्हणजेच 2047 मध्ये अमेरिका आणि चीनच्या बरोबरीने भारत उभा ठाकणार आहे, असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला. भारत जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये पहिल्या तीनमध्ये असणार आहे. 

आर्थिक उदारीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर बदल झाले. लायसन्स कोटा राज समाप्त झाले. व्यापार आणि औद्योगिक निती उदार झाली. यामुळेच भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्य़वस्था बनू शकला. लोकसंख्या भलेही 88 कोटींवरून 138 कोटी झाली असेल, परंतू गरीबीही निम्म्यावर आली आहे, असे ते म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'US-China, that day is not far away ...'; Mukesh Ambani's big prediction on India's 100th independence anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app