Corona Vaccination: कोरोना लसीकरणासाठी अमेरिकेकडून 2.5 कोटी डॉलरची मदत जाहीर; ब्लिंकननी घेतली मोदींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 10:31 PM2021-07-28T22:31:52+5:302021-07-28T22:32:53+5:30

Antony blinken tour on India; corona Vaccination help: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांना भेटून आनंद झाल्याचे म्हटले. अमेरिका आणि भारताचे सहकार्य लोकशाही मुल्यांना आकार देत आहे आणि जगाच्या भल्यासाठी एक ताकद असल्याचे म्हटले.

US Antony blinken announce an additional $25 million for Corona Vaccination in India; meet Narendra modi  | Corona Vaccination: कोरोना लसीकरणासाठी अमेरिकेकडून 2.5 कोटी डॉलरची मदत जाहीर; ब्लिंकननी घेतली मोदींची भेट

Corona Vaccination: कोरोना लसीकरणासाठी अमेरिकेकडून 2.5 कोटी डॉलरची मदत जाहीर; ब्लिंकननी घेतली मोदींची भेट

Next

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन (Antony blinken) यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. यावेळी मोदी यांनी भारत-अमेरिकेदरम्यान सहकार्य मजबूत करण्यावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भूमिकेचे स्वागत केले. तत्पूर्वी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर(S Jayshankar) यांची भेट घेतली. यावेळी ब्लिंकन यांनी भारताला कोरोना लसीसाठी 2.5 कोटी डॉलरची मदत देण्याची घोषणा केली. (US State secretory Antony blinken annonced help of 2.5 crore dollar for corona Vaccination in India.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांना भेटून आनंद झाल्याचे म्हटले. अमेरिका आणि भारताचे सहकार्य लोकशाही मुल्यांना आकार देत आहे आणि जगाच्या भल्यासाठी एक ताकद असल्याचे म्हटले.
ब्लिंकन हे मंगळवारी सायंकाळी भारतात आले आहेत. ते अन्य नेत्यांनाही भेटणार आहेत. आज त्यांनी दलाई लामांच्या प्रतिनिधीचीही भेट घेतली. 

एस. जयशंकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दोघांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ब्लिंकन यांनी अमेरिका कोरोना लसीकरणासाठी भारताला 2.5 कोटी डॉलरची मदत करणार असल्याची घोषणा केली. अमेरिकेने भारताला आधीच 2 कोटी डॉलरहून अधिक रकमेची कोरोना मदत दिली आहे. अमेरिका सरकार भारतातील लसीकरण मोहिमेला मदत करणार आहे. भारत आणि अमेरिकेतून कोरोना महामारी संपविण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. आम्ही एकत्र काम करत राहू, असे ब्लिंकन म्हणाले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: US Antony blinken announce an additional $25 million for Corona Vaccination in India; meet Narendra modi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app