एकदा नव्हे तर दोनदा पास झाली UPSC; महाराष्ट्राच्या लेकीची नेत्रदिपक भरारी, झाली IAS अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 17:40 IST2024-12-06T17:39:49+5:302024-12-06T17:40:41+5:30
कठोर परिश्रम योग्य दिशेने केले तर यश नक्कीच मिळतं.

एकदा नव्हे तर दोनदा पास झाली UPSC; महाराष्ट्राच्या लेकीची नेत्रदिपक भरारी, झाली IAS अधिकारी
यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या गोष्टी नेहमीच प्रेरणादायी ठरल्या आहेत. कारण त्यांनी केलेल्या मेहनतीची गोष्ट कठोर परिश्रम योग्य दिशेने केले तर यश नक्कीच मिळतं हे सांगते. IAS अधिकारी अर्पिता थुबे यांच्याकडून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी यश मिळवलं आहे.
IAS अधिकारी अर्पिता ठुबे यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये २१४ वा रँक मिळवला होता. अर्पिता या महाराष्ट्रातील ठाणे येथील रहिवासी आहेत. सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. देशसेवा करण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीयूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
२०१९ मध्ये UPSC परीक्षा दिली. मात्र, ती पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत. या अपयशानंतर त्यांना खूप वाईट वाटलं पण त्यांनी तयारी सुरूच ठेवली. पुन्हा प्रयत्न केले, यावेळी त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं. अर्पिता यांनी ३८३ वा रँक मिळवून भारतीय पोलीस सेवेत (IPS) आपलं स्थान निर्माण केलं. पण अर्पिता यांचं खरं स्वप्न आयएए होण्याचं होतं.
तिसऱ्यांदा परीक्षा दिली, अर्पिता यांनी २०२२ मध्ये आपलं ध्येय गाठलं. मेहनतीनंतर स्वप्न साकार झालं आणि त्या आयएएस झाल्या. अर्पिता थुबे यांच्या या प्रवासातून तुम्ही हे शिकू शकता की, जर योग्य पद्धतीने मेहनत केली तर योग्य वेळ आल्यावर तुम्ही अशक्य गोष्ट शक्य करू शकता. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात कोणतंही ध्येय गाठायचं असेल तर योग्य दिशेने कठोर परिश्रम करा.