शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

UPच्या कानपूरमध्ये झिका व्हायरसचे रुग्ण वाढले, एकूण रुग्णसंख्या 66 वर पोहोचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 14:34 IST

कानपूरमध्ये 23 ऑक्टोबरला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर ही संख्या झपाट्याने वाढत गेली.

कानपूर:उत्तर प्रदेशात झिका व्हायरसचे(Zika virus) अनेक रुग्ण सापडत आहेत. यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कानपूरमध्ये झिका व्हायरसचे 30 संक्रमित आढळले आहेत. कानपूरच्या चाकेरी भागातील कंटेनमेंट झोनमधून पाठवलेल्या नमुन्यात झिका व्हायरल संसर्गाची पुष्टी झाली आहे. नवीन बाधितांमध्ये 10 महिला आणि 20 पुरुष आहेत. यासह झिका बाधितांची एकूण संख्या 66 वर पोहोचली आहे.

आरोग्य विभागाने चाकेरी परिसर, हरजेंद्र नगर, एअरफोर्स कॉम्प्लेक्स, पोखरपूर, लालकुर्ती, मोतीनगर, अश्रफाबाद, आदर्शनगर आदी भागातील नमुने पाठवले होते. सीएमओ डॉ. नैपाल सिंह यांनी सांगितले की, 30 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी 10 महिला आहेत. त्याच वेळी, जिल्हा दंडाधिकारी विशाख जी अय्यर यांनी झिका विषाणूच्या प्रतिबंधासाठी नोडल अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष देण्यास सांगितले आहे.

जिल्हा दंडाधिकारी विशाख जी. अय्यर यांनी शुक्रवारी सांगितले की, कानपूरमध्ये आणखी 30 जणांमध्ये झिका विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे. जिल्ह्यात झिका विषाणूच्या संसर्गाची पहिली घटना 23 ऑक्टोबर रोजी नोंदवली गेली होती. त्यानंतर ही संख्या 66 वर पोहोचली आहे. हवाई दल केंद्राच्या परिसरातील लोकांचे नमुने गोळा करण्यात आले असून, ते लखनऊ येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

घरोघरी नमुने घेतले जात आहेतअय्यर पुढे म्हणाले की, झिका विषाणूची लागण झालेल्यांमध्ये 45 पुरुष आणि 21 महिलांचा समावेश आहे. हा विषाणू डासांमुळे पसरतो. डासांचा नायनाट करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. याशिवाय आरोग्य विभागाचे पथक तापाचे रुग्ण आणि गंभीर आजारी व्यक्तींवर मार्किंग करुन उपचार करत आहेत. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना घरोघरी जाऊन पाळत ठेवण्यासाठी आणि विषाणू चाचणीसाठी नमुने घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही झिका विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जलद आणि प्रभावी पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.    झिका व्हायरस प्राणघातक नाहीझिका विषाणू हवेतून किंवा स्पर्शातून पसरत नाही. डास रुग्णाला चावला आणि नंतर दुसऱ्या व्यक्तीला चावला तरच संसर्ग होतो. याशिवाय झिका हा जीवघेणाही नाही. 60 टक्के लोकांना संसर्ग झाला आहे हे देखील माहित नसते. जेव्हा विषाणूचा भार वाढतो तेव्हाच लक्षणे दिसून येतात. तसेच, रुग्ण 7 दिवस ते 14 दिवसात बरा होतो.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशZika Virusझिका वायरसkanpur-urban-pcकानपूर शहरी