मुलगी शिकली, प्रगती झाली! चहा विक्रेत्याची लेक बनली PCS ऑफिसर; यशासाठी केला संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 13:03 IST2023-04-10T13:02:03+5:302023-04-10T13:03:02+5:30

शिखाने 2022 च्या UPPCS परीक्षेत यश संपादन केले आहे आणि PCS अधिकारी पद मिळवले आहे. 

uppsc result 2022 tea seller daughter shikha become pcs officer | मुलगी शिकली, प्रगती झाली! चहा विक्रेत्याची लेक बनली PCS ऑफिसर; यशासाठी केला संघर्ष

फोटो - news18 hindi

मुलींना पुढे जाऊ दिलं की त्या नवा इतिहास घडवतात. UPPCS परीक्षेच्या 2022 च्या निकालातही असेच दृश्य पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये तसेच मेरठमध्ये मुलींनी घवघवीत यश संपादन करून आपल्या आई-वडिलांचं नाव उंचावलं आहे. मेरठच्या मलियाना येथील रहिवासी असलेल्या शिखाने 2022 च्या UPPCS परीक्षेत यश संपादन केले आहे आणि PCS अधिकारी पद मिळवले आहे. 

शिखाच्या या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. शिखाचे वडील जहां शर्मा हे चहाचं दुकान चालवतात. तर तिची आई गृहिणी आहे. कुटुंबात पहिल्यांदाच एखाद्या सदस्याने PCS परीक्षेत 2022 मध्ये यश मिळवून अधिकारी पद मिळवले आहे. परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकले, पण त्यानंतर कोचिंग सोडलं. त्याचबरोबर पॅटर्नमध्ये जे काही नवीन बदल झाले, त्या बदलांसह मी माझी तयारी सुरू ठेवली असं शिखाने म्हटलं आहे.

परीक्षेशी संबंधित सर्व विषयांची प्राथमिक पद्धतीने तयारी केली, जेणेकरून परीक्षा आणि मुलाखतीच्या वेळी कोणतीही अडचण येऊ नये. अनेक दिवसांपासून पीसीएस परीक्षेची तयारी करत होते. 2018 सालीही परीक्षा दिली, पण काही गुणांमुळे राहिलं, त्यानंतर मी विचार केला की आता मी परीक्षेची तयारी करणार नाही. मात्र, पालकांनी त्याला पुन्हा एकदा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचं देखील शिखाने सांगितलं. 

तयारीच्या वेळी जेव्हा कधी अडचण आली तेव्हा मोठा भाऊ पूर्ण साथ द्यायचा. घरच्यांच्याच प्रोत्साहनामुळे आणि पाठिंब्यामुळे आज यश मिळवले आहे. स्वप्न घेऊन पुढे जाणाऱ्या तरुणाईने कधीही हार मानू नये. जेव्हा आपण प्रवासाला निघतो तेव्हा अडचणीही येतात आणि अपयशही येतात. अपयशातून शिकून यशाची पायरी गाठली पाहिजे असंही ती सांगते. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: uppsc result 2022 tea seller daughter shikha become pcs officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.