शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मित्राने तरुणाला रुग्णालयात नेऊन केली शस्त्रक्रिया; शुद्धीवर आल्यावर बनली होती तरुणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 19:27 IST

उत्तर प्रदेशात एका तरुणाने त्याची मित्राची त्याला न सांगताचा लिंग बदल शस्त्रक्रिया केल्याची घटना घडली आहे.

Shocking News : उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुझफ्फरनगरच्या एका रुग्णालयात एक तरुण पुरुष म्हणून झोपलेला होता पण उटल्यानंतर त्याचे स्त्रीमध्ये रुपांतर झालं होतं. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या संगनमताने एका व्यक्तीने आपल्याच एका मित्रावर त्याला न कळवता लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया केली. ही घटना वाऱ्यासारखी सगळकडे पसरली. त्यानंतर आरोपी व्यक्ती आणि डॉक्टरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान युनियनचे कार्यकर्ते वैद्यकीय महाविद्यालयात बेमुदत संपावर बसले आहेत.

मुझफ्फरनगरमध्ये एका मित्राने आधी दुसऱ्या मित्रासोबत अनेक वर्षे व्यभिचार केला. त्यानंतर त्याला शस्त्रक्रियेच्या नावाखाली मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले, तिथे डॉक्टरांनी त्याचे लिंग बदलले. जेव्हा तरुण शुद्धीवर आला तेव्हा त्याचे रूपांतर मुलीत झाले होते. ही बाब भारतीय किसान युनियनला कळताच त्यांनीही तरुणाच्या कुटुंबीयांसह वैद्यकीय महाविद्यालय गाठले आणि आंदोलन करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आरोपीसह डॉक्टरला अटक करण्याची आणि पीडित तरुणाला ५० लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी युनियने केली आहे.

मुझफ्फरनगर मन्सूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हा सगळा प्रकार घडला. २० वर्षीय तरुण मुझफ्फरनगरमधील पेपर मिलमध्ये काम करायचा. याच मिलमध्ये शाहपूर पोलीस ठाण्यातील शोराम गावातील एक तरुण वीज फोरमन म्हणून काम करत होता. दोन वर्षांपूर्वी दोघांमध्ये मैत्री झाली आणि तेव्हापासून आरोपी तरुण पीडित तरुणावर व्यभिचार करत होता. त्यानंतर आरोपी तरुणाने पीडित तरुणाला रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर लिंग बदल शस्त्रक्रिया करुन घेतली.

पीडित तरुणाला बेशुद्ध करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तरुण जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याचे रूपांतर मुलीत झाले होते. हा प्रकार लक्षात येताच त्याला जबर धक्का बसला. पीडित तरुणाच्या म्हणण्यानुसार, आरोपीने त्याला येथे आणले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऑपरेशन झाले. ऑपरेशननंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी विचारले की ऑपरेशन कशासाठी आहे तेव्हा तो म्हणाला की ."मी तुला मुलापासून मुलगी बनवले आहे आणि आता तुला माझ्याबरोबर राहावे लागेल. आता ना तुझे नातेवाईक विचारणार ना समाजातील कोणी. मी वकील तयार केला आहे आणि तुम्हाला कोर्ट मॅरेज करावं लागेल." 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी