खळबळजनक! सुशिक्षित कुटुंब अचानक वेड्यासारखं वागू लागलं, स्मशानभूमीतून आणली राख अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:36 IST2025-04-15T12:35:48+5:302025-04-15T12:36:39+5:30

एका सुशिक्षित कुटुंबात घडलेल्या रहस्यमय घटनांमुळे संपूर्ण गाव दहशतीत आहे.

up meerut educated family behaving like mad exorcism reason behind | खळबळजनक! सुशिक्षित कुटुंब अचानक वेड्यासारखं वागू लागलं, स्मशानभूमीतून आणली राख अन्...

फोटो - nbt

मेरठमधील रिठानी भागातील एका सुशिक्षित कुटुंबात घडलेल्या रहस्यमय घटनांमुळे संपूर्ण गाव दहशतीत आहे. ओमप्रकाश यांच्या कुटुंबावर कोणीतरी जादूटोणा केला, ज्यामुळे सुखी कुटुंब उद्ध्वस्त झालं असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. कुटुंबातील सदस्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे आणि आता ते रस्त्यावर भटकत आहेत. ओमप्रकाश यांचा धाकटा मुलगा अनुज याचा रविवारी मृत्यू झाला, त्यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

ओमप्रकाश यांचे मोठा भाऊ सतीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील पाच सदस्यांवर काळी जादू करण्यात आली आहे. अनुजचा मृत्यू झाला आहे आणि कुटुंबातील इतर सदस्यांची मानसिक अवस्था बिघडली आहेत. ओमप्रकाश यांची चारही मुलं अभ्यासात हुशार होती. मोठी मुलगी पूजा ग्रॅज्युएशननंतर आयएएसची तयारी करत होती, तर धाकटी मुलगी प्रीती बी.एस्सी. करत होती. मुलगा अजय मिस्टर यूपी आहे आणि तो जिम ट्रेनर आहे, तर धाकटा मुलगा अनुज ग्रॅज्युएशन करत होता.

संपूर्ण कुटुंब वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बंद 

रविवारी संध्याकाळी मेरठमध्ये अनुजवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर टिल्लू, अजय, पूजा आणि आईला घराच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बंद करण्यात आलं जेणेकरून ते स्वतःला किंवा इतर कोणालाही इजा करू नये. असं सांगण्यात आलं की चौघांचीही मानसिक अवस्था चांगली नाही आणि ते बडबडत राहतात.

स्मशानभूमीतून आणली राख

स्थानिक लोकांच्या मते, ओमप्रकाश यांचं कुटुंब पंडित म्हणून काम करत होतं. ते जवळच्या स्मशानभूमीत वारंवार जात असे. घटनेच्या दिवशी सकाळी घराजवळ राखेची तीन पोती दिसली ज्यानंतर जवळच्या लोकांनी ती तिथून हटवली.  कुटुंबातील इतर सदस्यांनी ही राख स्मशानभूमीतून आणल्याचं सांगण्यात येत आहे. 

सुशिक्षित कुटुंब, मग नेमकं काय झालं?

या घटनेने आजूबाजूचे लोक हादरले आहेत. ओमप्रकाश यांचं कुटुंब सुशिक्षित आणि बुद्धिमान होतं असं सर्वजण म्हणतात. सर्व मुलं चांगला अभ्यास करत होती आणि भविष्याची तयारी करत होती. मग अचानक असं काय घडलं कुटुंबाची अवस्था अशी वाईट झाली असा हा प्रश्न आता लोकांना पडला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि चार दिवसांपासून कुटुंबावर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: up meerut educated family behaving like mad exorcism reason behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.