शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

नशेत तरुणाने गिळले २९ स्टीलचे चमचे, १९ टूथब्रश; ५ तासांची शस्त्रक्रिया करून पोटातून काढल्या ५० वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 20:36 IST

उत्तर प्रदेशात एका रुग्णाच्या पोटातून टूथब्रश, चमचा आणि पेन या गोष्टी काढण्यात आल्या.

UP Doctor: उत्तर प्रदेशातून एक विचित्र घटना समोर आली आहे. पोटातून केसांचे गुच्छ, कात्री आणि ब्लेड काढण्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण यावेळी उत्तर प्रदेशात विचित्र प्रकार समोर आला. पोटदुखीची तक्रार घेऊन आलेल्या एका तरुणाचा एक्स-रे काढला तेव्हा त्याच्या पोटात काही भलत्याच गोष्टी आढळल्या. डॉक्टरांनी ऑपरेशन सुरू केले आणि काही तासांतच तरुणाच्या पोटातून धक्कादायक गोष्टी मिळाल्या.

उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातून एका ४० वर्षीय व्यक्तीने स्टीलचा चमचा, टूथब्रश आणि पेन गिळून टाकल्याने त्याचा जीव धोक्यात आला होता. त्याला पोटात असह्य वेदना होत होत्या. या तरुणाला अंमली पदार्थांचे इतके व्यसन लागले होते की तो सर्व प्रकारचे पदार्थ खाऊ लागला. कधी तो पेन खात असे तर कधी टूथब्रश आणि चमचा खात असे. तो अंमली पदार्थाच्या व्यसनावर उपचार घेत होता. अचानक एके दिवशी त्याला पोटदुखीचा त्रास झाला तेव्हा तो एका खाजगी रुग्णालयात गेला. सर्व तपासणी प्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याचे यशस्वी ऑपरेशन केले. 

डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रियेतून तरुणाच्या पोटातून दोन पेन, १९ टूथब्रश, २९ चमचे काढण्यात आले आणि त्याचा जीव वाचला. देवनंदानी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, बुलंदशहरच्या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल असलेला सचिन पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात आला होता. सचिनला ताबडतोब दाखल करण्यात आले. एक्स-रे केल्यानंतर डॉक्टरांना त्याच्या पोटात काही असामान्य वस्तू आढळल्या. रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. श्याम कुमार आणि डॉ. संजय राय यांनी शस्त्रक्रिया केली.

शस्त्रक्रियेदरम्यान आम्हाला दोन पेन, १९ टूथब्रश आणि २९ चमचे सापडले आणि रुग्ण वाचला. प्राथमिक तपासात सचिनने व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असताना नशेत असताना या वस्तू गिळल्या होत्या.  पाच तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर, डॉ. श्याम कुमार यांच्यासह पाच जणांच्या पथकाने सर्व वस्तू काढल्या. डॉक्टरांनी २३ सप्टेंबर रोजी त्याला डिस्चार्ज दिला. डॉक्टरांनी सचिनला मानसिक आजार असल्याचे सांगितले. हे प्रकरण ट्रायकोटिलोमॅनिया किंवा पिका डिसऑर्डरशी संबंधित असू शकते, या गंभीर मानसिक विकारामध्ये एखादी व्यक्ती वस्तू गिळते.

English
हिंदी सारांश
Web Title : Drunk Man Swallows 29 Spoons, 19 Brushes; 50 Items Removed

Web Summary : A UP man with addiction swallowed spoons, toothbrushes. Doctors surgically removed 29 spoons, 19 toothbrushes, and other items from his stomach after he complained of stomach pain. The patient is now recovering after the five-hour surgery.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdoctorडॉक्टर