UP Crime : उत्तर प्रदेशच्या फतेपूरमध्ये उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलांमध्ये झालेल्या भांडणात एकाच्या आईचा मृत्यू झाला. शाळेतल्या मारहाणीचे कारण विचारल्यामुळे संतापलेल्या आठवीच्या विद्यार्थ्याने चाकूने एका महिलेचा गळा चिरला. हत्येनंतर अल्पवयीन आरोपी फरार झाला आहे. मृत महिलेच्या सासूच्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ वादातून महिलेचा चाकूने गळा चिरून खून करणारा तरुण संतप्त स्वभावाचा आहे. शाळेत त्याचे अनेकदा भांडण व्हायचं. वर्षभरापूर्वी आईने केलेली शिवी त्याला सहन त्याने आईलाही मारहाण केली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
फतेपूरच्या जाफरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामदिनवापूर गावात हा सगळा प्रकार घडला. दोन्ही मुले आठवीत शिकत होती. फतेहपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय शंकर मिश्रा यांनी यांनी सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली की एका १४ वर्षाच्या मुलाने ३५ वर्षीय राणी देवी यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. नंतर पोलिसांनी येऊन तपास केला. यादरम्यान, अल्पवयीन आरोपी आणि मृत महिलेचा मुलगा राणीदेवी गावातील एकाच शाळेत शिकत असल्याचे समोर आले. शाळेतच दोघांमध्ये शिवीगाळ आणि बाचाबाची झाली होती.
"मृत महिलेच्या मुलाने ही घटना त्याच्या आईला सांगितले होते. त्यानंतर आरोपी मुलगा मृत महिलेच्या घरासमोरून जात होता. त्यानंतर महिलेने त्याला आपल्या मुलासोबत झालेल्या भांडणाबद्दल विचारले. त्यामुळे संतप्त झालेल्या मुलाने महिलेवर चाकूने हल्ला केला. त्यामुळे राणीदेवीचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी शांतता व सुव्यवस्था राखण्यात आली आहे.अल्पवयीन आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत," असे विजय शंकर मिश्रा यांनी सांगितले.
मृत मुलाने सांगितले की, आई नुसती त्याच्याकडे चौकशी करत होती. त्यानंतर तो अचानाक संतापला आणि त्याने शिवीगाळ करून आईवर हल्ला केला. आईच्या पाठोपाठ तो मलाही मारायला धावला. आरडाओरड झाल्यानंतर कुटुंबियातील इतर लोक जमा झाले. वर्षभरापूर्वी किरकोळ वादातून त्याने आईलाही काठीने मारहाण करून जखमी केले होते. या घटनेदरम्यान अल्पवयीन आरोपीने महिलेवर तीन वार केले. त्याला मुलावरही हल्ला करायचा होता. आईच्या मागे लपल्याने तो वाचला.
शाळेतही अल्पवयीन आरोपीची दादागिरी सुरू असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. "त्याच्यामुळे शिक्षिका घाबरून त्यांची खुर्ची सोडून निघून जायच्या. लाथ मारून तो खुर्चीवर बसायचा. त्याने आईलाही अनेकदा मारहाण केली होती आणि एकदा काठीने मारहाण करून तिचे डोके फोडले होते. क्षुल्लक वादावर तो लोकांना मारहाण करायला तयार व्हायचा," असं गावकऱ्यांनी सांगितले.