शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

"मारू नकोस, मी घटस्फोट देतो"; बॉयफ्रेंन्डसोबत मिळून केली हत्या, पतीचा मृतदेह ड्रममध्ये टाकून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 09:53 IST

उत्तर प्रदेशात एका घरात ड्रममध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Meerut Crime :उत्तर प्रदेशच्या मेरठमधून हादरवून टाकणारं टाकणारं हत्याकांड समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका महिलेने प्रियकरासह पतीची हत्या केली. दोघांनी मृतदेहाचे १५ तुकडे करून ते एका ड्रममध्ये भरुन त्यात सिमेंट भरलं होतं. या प्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महिलेनेच तिच्या आईला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांना हा सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या सौरभ राजपूतच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. सौरभची पत्नी मुस्कानने प्रियकरासह मिळून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे १५ तुकडे करून प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून ठेवले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण समोर आलं. पोलिसांना दोन तासांच्या प्रयत्नानंतरही ड्रम उघडता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी ड्रम ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला. त्यानंतर ड्रम कापून त्यातून मृतदेहाचे तुकडे बाहेर काढण्यात आले. सिमेंटमुळे मृतदेह कडक झाला होता. 

मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा सौरभ राजपूत हा पत्नी मुस्कान रस्तोगी आणि पाच वर्षांच्या मुलीसह इंदिरानगरमध्ये राहत होता. नोकरीच्या निमित्ताने तो लंडनला होता आणि काही दिवसांपूर्वीच तो घरी आला होता. सौरभ आणि मुस्कानचा २०१६ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्नानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये वाद होऊ लागला ज्यामुळे तीन वर्षांपासून ते इंदिरानगरमध्ये भाड्याच्या घरात राहू  राहू लागले. ४ मार्चला  सौरभ मेरठमध्ये आला होता. त्यानंतर मुस्कानने आजूबाजूच्या लोकांना आम्ही हिमाचल प्रदेशला फिरायला जातोय असं सांगितले. तेव्हापासून मुस्कान आणि सौरभ कोणीही दिसलं नाही. त्यानंतर अचानक मुस्कानने प्रियकरासह सौरभची हत्या केल्याचे तिच्या आईला सांगितले. मुस्कानच्या आईने पोलीस ठाणे गाठलं आणि संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. 

त्यानंतर पोलिसांनी मुस्कान आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण समोर आलं. मुस्कानने प्रियकर साहिलसोबत मिळून सौरभची हत्या केली होती. लोकांना कळू नये म्हणून सौरभच्या मृतदेहाचे तुकडे ड्रममध्ये टाकून घरात लपवून ठेवले होते. डॉक्टरांनी ड्रम कापून त्यातून सौरभचा मृतदेह बाहेर काढला.

कशी केली हत्या?

पाच वर्षांच्या मुलीमुळे सौरभने मुस्कानला घटस्फोट देण्यास नकार दिला होता. त्यामुळे मुस्कानने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. तिने झोपलेल्या सौरभचा हात धरुन ठेवला. त्यानंतर साहिलने त्याच्या छातीवर चाकूने वार केले. पहिल्या हल्ल्यात सौरभ ओरडला. मला मारू नकोस, मी तुला घटस्फोट देईन, असं सौरभ म्हणाला. पण साहिल आणि मुस्कान थांबले नाहीत. त्यांनी सौरभची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले.

मुस्कान आणि साहिल ड्रग्जही घेत होते. खुनाच्या दिवशीही दोघांनी सिगारेटमध्ये ड्रग्ज घेतले होते. त्याच नशेत सौरभची हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये भरले. त्यानंतर त्यावर सिमेंट टाकलं आणि पाणी ओतलं. ते सिमेंट एका रात्रीच दगडासारखे झाले. हत्येनंतर दोघेही तिथेच होते. बाजारातून त्यांनी ड्रम आणि सिमेंटची गोणी खरेदी केली होती. सौरभने त्याबाबत विचारले असता तिने पीठ भरण्यासाठी ड्रम ठेवल्याचे सांगितले. तर साहिलने सिमेंटची गोणी मित्राच्या घरी ठेवली होती. हत्येनंतर तो सिमेंट बाईकवर घेऊन आला होता.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस