शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

UP Assembly Elections: टिकेत बंधूंनी सपा युतीला दिलेला पाठिंबा मागे घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 10:36 IST

नरेश टिकेत यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात ते सपा उमेदवारांचा प्रचार करताना दिसतात.

- शरद गुप्तानवी दिल्ली : भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकेत प्रयागराजमध्ये सोमवारी समाजवादी पार्टीच्या उमेदवार रिचा सिंह यांचा प्रचार करताना दिसले. साधारण त्याचवेळी त्यांचे बंधू नरेश टिकेत यांनी मुजफ्फरनगरमध्ये निवेदन प्रसिद्धीस देऊन सपा युतीला दिलेला पाठिंबा मागे घेतला.नरेश टिकेत यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात ते सपा उमेदवारांचा प्रचार करताना दिसतात. जाट मतांच्या चिंतेत केंद्रीय मंत्री संजीव बालियान सोमवारी सकाळी नरेश टिकेत यांना भेटायला गेले. दुपारी नरेश टिकेत यांनी सपाला दिलेला पाठिंबा मागे घेतला.  टिकेत बंधूंवर दोन्हीकडून मोठा दबाब आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची इच्छा होती की, नरेश टिकेत यांचा मुलगा किंवा भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते धर्मेंद्र मलिक यांनी बड़ौतहून रालोदच्या तिकिटावर लढावे. त्यामुळे जाट समाजात स्पष्ट संदेश जाईल की, टिकेत बंधू सपा-रालोद युतीसोबत आहेत.नरेश टिकेत आपले उमेदवार देण्यास तयार नाहीत. परंतु, त्यांनी काही सपा - रालोद उमेदवारांना पाठिंब्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मंत्री संजीव बालियान त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी आवाहन परत घेतले. टिकेत बंधूही बालियान खापचे आहेत.सपाला भीती आहे की, जाट रालोद उमेदवारांना मत तर देतील. परंतु, युतीमध्ये जेथे सपा उमेदवार आहेत, त्यांना मत न देता जाट भाजपच्या बाजूने मत देऊ शकतात. यामागे २०११मध्ये मुजफ्फरनगर दंगलींनंतर सुरू झालेला जाट - मुस्लिम संघर्षही एक कारण आहे. एक जाट नेता म्हणतो की, आमच्या जखमा अजून भरल्या नाहीत. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Samajwadi Partyसमाजवादी पार्टी