महागणपती सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:17+5:302015-03-20T22:40:17+5:30
सोसायटी निवडणूक : बाराही जागा जिंकल्या

महागणपती सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व
स सायटी निवडणूक : बाराही जागा जिंकल्यारांजणगाव गणपती : येथील रांजणगाव गणपती विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक चुरशीची झाली. या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत महागणपती सहकार पॅनेलने सर्व जागा जिंकून सोसायटीवर पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.विरोधी मंगलमूर्ती परिवर्तन पॅनेलला एकही जागा जिंकता न आल्याने त्यांना दारूण पराभव पत्करावा लागला. निवडणुकीपूर्वी विद्यमान संचालक विष्णू साळंुके हे सत्ताधारी पॅनेलकडून बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित १२ जांगासाठी ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत माजी जि.प.सदस्य शेखर पाचुंदकर व शिरूर बाजार समितीचे उपसभापती मानसिंग पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखालील महागणपती पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणुकीसाठी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शिरूर व शिक्रापूर येथील पोलिसांना बंदोबस्तासाठी घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या वेळी विजयी उमेदवारंाची महागणपती मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. शेखर पाचुंदकर, मानसिंग पाचुंदकर यांच्या हस्ते सर्व विजयी उमेदवारांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी आंबेगाव-शिरूर मतदार संघ राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब भोर, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ताशेठ पाचुंदकर, सरपंच स्वाती पाचुंदकर उपसरपंच नवनाथ लांडे उपस्थित होते. आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्यांचे प्रश्न सोडविले जातील, असे पॅनेलप्रमुखांनी सांगितले. चौकटमहागणपती पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : सर्व साधारण कर्जदार प्रतिनिधी-सुभाष फंड, गोरक्ष गदादे, केरू कुटे, भाऊसाहेब लांडे, प्रकाश लांडे, सुनील लांडे, विठ्ठल लांडे, काळुराम पाचुंदकर.अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी-मंगेश शेलार, महिला प्रतिनिधी सुनीता पाचुंदकर, शोभा शेळके, तर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून आत्माराम खेडकर हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत. फोटो : रांजणगाव गणपती येथील सोसायटीच्या निवडणुकीत महागणपती पॅनेलचे उमेदवार विजयोत्सव साजरा करताना.