अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 05:45 IST2025-12-27T05:45:00+5:302025-12-27T05:45:12+5:30
राष्ट्रपतींनी केले सन्मानित; महाराष्ट्रातून अर्णव महर्षीचा झाला गौरव

अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी शौर्य, सामाजिक सेवा, पर्यावरण, क्रीडा, कला, संस्कृती व विज्ञान अशा क्षेत्रांत असामान्य कामगिरी करणाऱ्या देशभरातील २० मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने’ सन्मानित केले. १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून मुलांची निवड करण्यात आली.
१४ वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील महाराष्ट्राचा अर्णव महर्षी, बुद्धिबळात भारताला महाशक्ती म्हणून ओळख देणारी सात वर्षीय वाका लक्ष्मी प्रग्निका, पित्याची मगरीच्या तावडीतून सुटका करणारा अजय राज आणि आपल्या दोन मित्रांचे वीजप्रवाहातून प्राण वाचवणारा मोहम्मद सिदान, लहान मुलांचा जीव वाचवताना आपला प्राण गमावणारी ८ वर्षीय व्योमा, अशा सर्वांचा राष्ट्रपतींनी गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला.
असे आहेत पुरस्कार विजेते : वैभव सूर्यवंशी (१४ वर्षे) - क्रीडा- बिहार I अर्णव महर्षी (१७ वर्षे) - विज्ञान व तंत्रज्ञान- महाराष्ट्र I वाका लक्ष्मी प्रज्ञिका (७ वर्षे) - क्रीडा - गुजरात I योगिता मंडावी (१४ वर्षे) - क्रीडा - छत्तीसगड I अनुष्का कुमारी (१४ वर्षे) - क्रीडा - झारखंड I शिवानी होसुरू उप्परा (१७ वर्षे) - क्रीडा - आंध्र प्रदेश I ज्योती (१७ वर्षे) - क्रीडा- हरयाणा I धिनिधी देसिंघू (१५ वर्षे) - क्रीडा - कर्नाटक I ज्योत्स्ना साबर (१६ वर्षे) - क्रीडा - ओडिशा I विश्वनाथ कार्तिकेय (१६ वर्षे) - क्रीडा - तेलंगणा I मोहम्मद सिद्दान (११ वर्षे) - शौर्य - केरल I अजय राज (१६ वर्षे) - शौर्य - उत्तर प्रदेश I ब्योमा प्रिया, मरणोत्तर (६ वर्षे) - शौर्य - तामिळनाडू I कमलेश कुमार, मरणोत्तर (११ वर्षे) - शौर्य -बिहार I ऐशी प्रिशा बोराह (१० वर्षे) - पर्यावरण - आसाम I पूजा (१७ वर्षे) - पर्यावरण - उत्तर प्रदेश I वंश तायल (१७ वर्षे) - सामाजिक सेवा - चंडीगड I सुमन सरकार (१६ वर्षे) - कला व संस्कृती - पश्चिम बंगाल I एस्तेर लालदुहावमी हनमते (९ वर्षे) - कला व संस्कृती - मिझोराम I श्रवणसिंग (१० वर्षे) - सामाजिक सेवा - पंजाब