Unnao rape case : A lawyer fighting a case against Kuldeep Sanger was Passes away, he injured in a road accident | कुलदीप सेंगरविरोधात खटला लढणाऱ्या वकिलाचा मृत्यू, रस्ते अपघातात झाले होते जखमी

कुलदीप सेंगरविरोधात खटला लढणाऱ्या वकिलाचा मृत्यू, रस्ते अपघातात झाले होते जखमी

ठळक मुद्देकुलदीप सिंह सेंगर याच्याविरोधात खटला लढणारे वकील महेंद्र सिंह माखी यांचे निधनमहेंद्र सिंह माखी हे रायबरेलीमध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होतेरायबरेली येथे झालेल्या अपघातात ते जखमी झाले होते. त्यानंतर त्यांचे मल्टिऑर्गन डॅमेज झाले होते

लखनौ - उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगर याच्याविरोधात खटला लढणारे वकील महेंद्र सिंह माखी यांचे निधन झाले आहे. महेंद्र सिंह माखी हे रायबरेलीमध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, तब्येत बिघडल्यानंतर एक वर्षाने त्यांचे निधन झाले आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणी न्यायालयात झालेल्या खटल्यात महेंद्र सिंह माखी यांनी पीडितेच्या बाजूने साक्षी पुरावे मांडले होते. दरम्यान, रायबरेली येथे झालेल्या अपघातात ते जखमी झाले होते. त्यानंतर त्यांचे मल्टिऑर्गन डॅमेज झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. मात्र आता अचानक तब्येत बिघडल्याने जिल्हा रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

जुले २०१९ मध्ये उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडिता आपल्या कुटुंबीयांसोबत आणि वकिलांसोबत रायबरेली येथे जात होती. तेव्हा एका ट्रकने गाडीला धडक दिली होती. या अपघातात पीडितेची काकी आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला होता. तर वकील आणि पीडिता जखमी झाले होते.

दरम्यान, उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांचा पोलिसांच्या कोठडीत असतानाच मृत्यू झाला होता. या मृत्यूप्रकरणी माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. आता सीबीआय कोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात सेंगर याने न्यालयात आव्हान दिले होते.

उन्नाव बलात्कार प्रकरणी कुलदीप सिंह सेंगरसह एकूण सात आरोपींनी प्रत्येकी दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. याशिवाय न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. उन्नाव बलात्कार प्रकरणात नाव आल्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश विधानसभेतून कुलदीप सिंह सेंगरचे सदस्यत्व रद्द केले होतो.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Unnao rape case : A lawyer fighting a case against Kuldeep Sanger was Passes away, he injured in a road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.