पोलीस वाचवणार नाहीत... घरात धनुष्यबाण, कोल्ड्रिंक्सचे बॉक्स ठेवा; BJP नेत्याच्या विधानाने नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 03:22 PM2022-04-24T15:22:41+5:302022-04-24T15:31:58+5:30

BJP Sakshi Maharaj : साक्षी महाराज यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

unnao bjp mp sakshi maharaj controversial facebook post | पोलीस वाचवणार नाहीत... घरात धनुष्यबाण, कोल्ड्रिंक्सचे बॉक्स ठेवा; BJP नेत्याच्या विधानाने नवा वाद

पोलीस वाचवणार नाहीत... घरात धनुष्यबाण, कोल्ड्रिंक्सचे बॉक्स ठेवा; BJP नेत्याच्या विधानाने नवा वाद

Next

नवी दिल्ली - भाजपा खासदारसाक्षी महाराज (BJP MP Sakshi Maharaj) हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहे. मात्र आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. साक्षी महाराज यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी पोलिसांवर जोरदार टीका केली आहे. तर, नागरिकांना आपल्या सुरक्षेसाठी धनुष्यबाण आणि कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या सोबत ठेवण्याचं आवाहन केलं आहे. 

साक्षी महाराजांनी केलेल्या नव्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेला सुरुवात झाली आहे. पोलिसांवर टीकास्त्र सोडलं असून ते घाबरत असल्याचं म्हटलं आहे. तुमच्या गल्लीत अचानक जमाव आल्यास तुमच्याकडे वाचण्याचे काय उपाय आहेत. तुमच्याकडे काही उपाय नसतील तर ते करुन घेण्याचं आवाहन साक्षी महाराजांनी केलं आहे. पोलीस तुम्हाला वाचवण्यास येणार नाही तर ते स्वत:चा बचाव करण्यासाठी कुठे तरी लपून बसतील. काही दिवसानंतर प्रकरण चौकशी समितीसमोर जाईल आणि संपेल, असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे.

घरी येणाऱ्या अशा पाहुण्यांसाठी कोल्ड्रिंक्सच्या एक किंवा दोन पेट्या आणि धनुष्यबाण घरात असावा, असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. साक्षी महाराज यांनी एक फोटो देखील ट्विट केला आहे. साक्षी महाराज यांच्या विधानामुळे याआधी देखील वाद निर्माण झाले होते. साक्षी महाराजांची फेसबुक पोस्ट देशभरात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: unnao bjp mp sakshi maharaj controversial facebook post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.