शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
4
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
5
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
6
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
7
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
8
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
9
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
10
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
11
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
12
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
13
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
14
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
15
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
16
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
17
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
18
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
19
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
20
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

Unlock: काही राज्यांत १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरू होणार; महाराष्ट्रात मात्र बंदी कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 06:58 IST

Coronavirus, Unlock Cinema Hall Reopening News: उत्तर प्रदेश, हिमाचलसह काही राज्यांत परवानगी, कोरोनाच्या साथीमुळे गेले सात महिने चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स बंदच असून, त्यामुळे मालकांना तोटा झाला आहे.

नवी दिल्ली : अनलॉकच्या पाचव्या टप्प्यांतर्गत येत्या गुरुवारी, १५ ऑक्टोबरपासून मल्टिप्लेक्स, तसेच चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आदी राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी घेतला आहे, तर कोरोना साथ अजून न निवळल्याने महाराष्ट्र, राजस्थान, ओदिशा, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये मात्र मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह यापुढेही बंदच राहणार आहेत.१५ ऑक्टोबरपासून केंद्र सरकारने ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देऊन चित्रपटगृह, तसेच मल्टिप्लेक्स सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, आपापल्या राज्यातील व केंद्रशासित प्रदेशांतील स्थिती पाहून तेथील प्रशासनाला याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

जिथे मल्टिप्लेक्स व चित्रपटगृहे १५ ऑक्टोबरपासून उघडण्याची परवानगी देणारी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये हरयाणा, पंजाब, गुजरात, मणिपूर, बिहार, गोवा, छत्तीसगढ, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, पुदुचेरी, चंदीगड यांचाही समावेश आहे, तर चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स अजून काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम या राज्यांनी घेतला आहे. बॉलिवूडचे चित्रपट खाली पिली, का पाई रणसिंघम हा तामिळ चित्रपट, स्पाय, फोर्स ऑफ नेचर, द सेंटल हे चित्रपट १५ ऑक्टोबर रोजी विविध चित्रपटगृहांत व मल्टिप्लेक्समध्ये झळकणार आहेत. कोरोनाच्या साथीमुळे गेले सात महिने चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स बंदच असून, त्यामुळे मालकांना तोटा झाला आहे.प्रेक्षक क्षमतेपेक्षा निम्म्या लोकांनाच मिळणार प्रवेशमल्टिप्लेस, चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने काही नियम घालून दिले आहेत. मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहांच्या प्रेक्षक क्षमतेपेक्षा निम्म्या लोकांनाच प्रवेश देण्यात यावा, तसेच एक सीट सोडून प्रेक्षकांना बसविण्यात यावे, प्रत्येक प्रेक्षकाने मास्क घालणे बंधनकारक आहे असे काही नियम लागू करण्यात आले आहेत. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्समध्ये वायूविजनची उत्तम सोय असणे, तसेच एअर कंडिशनरचे तापमान २३ अंश सेल्सियस ठेवावे, असेही निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcinemaसिनेमाMaharashtraमहाराष्ट्र