शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
3
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
4
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
5
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
6
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
7
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
8
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
9
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
10
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
11
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
12
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
14
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
15
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
16
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
17
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
18
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
19
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
20
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू

राजस्थानची अनोखी रामलीला; कुठलाच कलाकार एकही शब्द बोलत नाही, 200 वर्षे जुनी परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 18:17 IST

ही अनोखी रामलीला पाहण्यासाठी देशभरातून प्रेक्षक येतात. जाणून घ्या या अनोख्या रामलीलेबद्दल...

Ramleela : भारतात सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. यानिमित्त अनेक ठिकाणी रामलीलेचे आयोजन केले जाते. भारतात आजपासून नाही, तर अनेक शतकांपासून रामलीला आयोजित केली जात आहे. काही ठिकाणी रामलीला दशमीपर्यंत, तर काही ठिकाणी दिवाळीपर्यंत सुरू असते. रामलीलेत कलाकार श्रीराम, लक्ष्मण आणि रामायणातील विविध पात्रे साकारतात, त्यांच्यासारख्या वेषभुषा करतात आणि संवाद बोलतात.

बहुतांश ठिकाणी रामलीला सारखीच असते. पण आम्ही तुम्हाला एका अशा रामलीलेविषयी सांगणार आहोत, जी इतर ठिकाणांपेक्षा खूपच वेगळी आहे. या रामलीलेत एकही पात्र संवाद बोलत नाही. म्हणजे या रामलीलेत मूक अभिनय केला जातो. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील बिसाऊ येथे होणारी मूक रामलीला खूप लोकप्रिय आहे. 

झुंझुनूची मूक रामलीलाराजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील बिसाऊ येथे दरवर्षी मूक रामलीला आयोजित केली जाते. या रामलीलेची खास गोष्ट म्हणजे, यात एकही पात्र संवाद बोलत नाही. मूक अभिनयातून आपला संदेश जनतेपर्यंत पोहोचवतात. सुमारे 15 दिवस चालणारी ही मूक रामलीला पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून लोक येतात. आजपासून नाही तर जवळपास 200 वर्षांपासून येथे मूक रामलीला सुरू असल्याचे सांगितले जाते.

मूक रामलीला कशी सुरू झाली?मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे 200 वर्षांपूर्वी झुंझुनू जिल्ह्यातील बिसाऊमध्ये जमना नावाची साध्वी राहत होती. त्यांनी एकदा एका गावात काही मुलांना एकत्र केले आणि त्यांना रामलीला रंगवायला लावली. मात्र, रामलीलाच्या मंचकादरम्यान मुले संवाद बोलू शकले नाहीत. त्यामुळे साध्वीने त्यांना संवाद न बोलता फक्त हावभाव आणि हातवारे करायला सांगितले. यानंतर या परिसरात मूक रामलीला होऊ लागल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानJara hatkeजरा हटके