Video: राहुल को लग गयी है चाहूल; 2019 का मोदीजी ने बनाया है माहूल; आठवलेंच्या कवितेनं लोकसभेत हशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 13:37 IST2019-02-08T13:30:32+5:302019-02-08T13:37:24+5:30
आठवलेंची कविता ऐकून पंतप्रधान मोदींना हसू आवरेना

Video: राहुल को लग गयी है चाहूल; 2019 का मोदीजी ने बनाया है माहूल; आठवलेंच्या कवितेनं लोकसभेत हशा
नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव आणण्यात आला. त्यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी त्यांच्या भाषणादरम्यान कविता सादर केली. यामुळे संसदेत एकच हशा पसरला. आठवलेंनी त्यांच्या कवितेतून मोदींचं तोंडभरुन कौतुक करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह विरोधकांवर तोंडसुख घेतलं.
Ramdas Athawale 😂😂🙌😍😭😂#ModiUnstoppablepic.twitter.com/YlAt01Ua4a
— Hardik (@Humor_Silly) February 7, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर आठवलेंनी भाषण केलं. त्यांच्या कवितांमुळे संसदेत हास्याची कारंजी उडाली. विशेष म्हणजे आठवलेंची कविता ऐकून मोदींनाही हसू आवरलं नाही. राहुल को लग गयी है चाहूल; 2019 का मोदीजी ने बनाया है माहूल, असं आठवले यांनी म्हणताच सभागृहात तुफान हशा पिकला. आठवलेंची ही धमाल कविता सोशल मीडियावर चांगलीच वायरल झाली आहे.
Ramdas Athawale Roxx 😂😂🤙🤘🤘 pic.twitter.com/MIiCv0jpt6
— AMIT (@AMIT_GUJJU) January 8, 2019
याआधीही रामदास आठवलेंनी अनेकदा संसदेत भाषणादरम्यान कविता सादर केल्या आहेत. त्यांच्या या कविता चांगल्याच चर्चेतही राहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मोदी सरकारनं सवर्ण आरक्षण विधेयक मांडलं होतं. त्यावेळीही आठवलेंनी कविता सादर करत मोदींचं कौतुक केलं होतं. त्यांची ती कविताही सोशल मीडियावर चांगलीच वायरल झाली होती.