शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

राहुलचं पीएमपद म्हणजे मुंगेरीलाल के सपने; स्मृती इराणींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 3:37 PM

स्वप्न बघायला कुठे मनाई आहे?; राहुल गांधींच्या पीएम पोस्टरवर स्मृती इराणींचा टोला

लखनऊ: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीपंतप्रधानपदाची स्वप्नं पाहत आहेत, तर पाहू दे. स्वप्न पाहण्यास कुठे मनाई आहे. राहुल गांधींची स्वप्नं म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत, असा टोला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लगावला आहे. राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीत 'भावी पंतप्रधान' असा उल्लेख असलेले राहुल गांधींचे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यावरुन इराणींनी टोला लगावला. स्मृती इराणी सध्या अमेठी दौऱ्यावर आहेत. छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेसनं भाजपाचा पराभव केल्यावर अमेठीत राहुल गांधींचे बॅनर झळकले. यावर 'भावी पंतप्रधान' असा उल्लेख आहे. त्यावर पत्रकारांनी स्मृती इराणींना त्यांची प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना स्वप्न पाहण्यास कुठे मनाई आहे? असा प्रश्न विचारत स्मृती इराणींनी राहुल गांधींना टोला लगावला. 'राहुल गांधींना महाआघाडीत तसा (पंतप्रधानपदाचा) आशीर्वाद ना मायावतींनी दिलाय, ना अखिलेशनं दिलाय. ममता गांधींनीही राहुल यांच्या पंतप्रधानपदाबद्दल अनुकूल भाष्य केलेलं नाही. मग मुंगेरीलालची स्वप्नं पाहायला कोणी मनाई केली आहे?' असं इराणी म्हणाल्या.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्मृती इराणी कामाला लागल्या आहेत. गेल्या निवडणुकीत अमेठीत इराणींनी राहुल यांना टक्कर दिली होती. मात्र त्या पराभूत झाल्या होत्या. येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणूक होईल. गेल्या महिन्यातच काँग्रेसनं हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. त्यातच राहुल गांधी संसदेतही सक्रीय झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींना धक्का देण्यासाठी इराणींनी कंबर कसली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशprime ministerपंतप्रधानSmriti Iraniस्मृती इराणी