शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात आदिवासी विकासाचा निधी अखर्चित, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 11:48 IST

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या डॉ. भारती पवार यांना घरातून राजकीय वारसा  लाभला आहे.

सुरेश भुसारी - नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला कोट्यवधी रुपयांचा निधी पाठविला आहे; परंतु हा निधी अद्यापही अखर्चित असल्याचा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या डॉ. भारती पवार यांना घरातून राजकीय वारसा  लाभला आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या पवार पहिल्यांदा २०१९ मध्ये भाजपच्या खासदार म्हणून निवडून आल्या. त्यांना गेल्या वर्षी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपद मिळाले. कोरोना काळात, तसेच देशातील आरोग्य सुविधांमध्ये सुधार करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे मत आहे. आरोग्य, कोरोना काळातील आव्हाने, तसेच महाराष्ट्रातील आरोग्य समस्यांबाबत त्यांच्याशी केलेली ही बातचीत.कोरोनाची तिसरी लाट लवकर ओसरली व या लाटेचे स्वरूप अधिक गंभीर नव्हते. काय कारण आहे? - कोरोना आपल्यासाठी हा नवा रोग होता. आपल्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगात या विषाणूची माहिती फारशी कुणाला नव्हती. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या लाटेत आपण आपल्या आरोग्य सुविधा बळकट करण्यावर अधिक भर दिला. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये लोकांना अधिक गंभीर संकटाचा सामना करावा लागला. या दोन लाटांमध्ये आलेले अनुभव तिसऱ्या लाटेच्या वेळी कामी आले. यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची व काही विशिष्ट औषधींची गरज असते. याची पूर्तता केंद्र सरकारतर्फे करण्यात आल्यामुळे तिसरी लाट लवकर ओसरण्यास मदत झाली.यावर्षीच्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्याच्या तरतुदीमध्ये कपात झालेली आहे. यामागची कारणे काय आहेत? - आरोग्य खात्याच्या तरतुदीमध्ये कपात झालेली नाही. गेल्या वर्षी आपल्याला लोकांचे कोरोना लसीकरण करावयाचे होते. त्यामुळे आरोग्य खात्याला अधिक तरतुदीची गरज होती. आज या तरतुदीमुळेच देशात लसीचे १६५ कोटी डोस आपण देऊ शकलो. अनेकांचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात लसीकरणावरील खर्च कमी होणार आहे. यामुळे यावर्षीच्या तरतुदींमध्ये कपात झालेली दिसून येते. महाराष्ट्रात कुपोषणाचा मोठा प्रश्न आहे. यावर केंद्राच्या काय उपाययोजना आहेत? - महाराष्ट्रात हा प्रश्न अनेक वर्षांपासून आहे. प्रामुख्याने आदिवासी भागामध्ये हा प्रश्न आपल्याला अधिक गंभीर असल्याचे दिसून  येतो. आदिवासींच्या विकासासाठी केंद्र सरकारतर्फे राज्य सरकारला निधी दिलेला आहे. जवळपास १,१०० कोटी रुपयांचा हा निधी आहे. यापैकी बराचसा निधी अद्यापही अखर्चित आहे. हा निधी महाराष्ट्रात खर्च होण्याची आवश्यकता आहे.

कोरोनाच्या लाटा वारंवार येत आहेत. त्या थोपविण्यासाठी काही विशेष प्रयत्न होत आहेत? - यावर अशी कोणतीची एक उपाययोजना नाही. कोरोना रुग्ण ट्रेस करणे, त्यांची चाचणी करणे व त्यांच्यावर उपचार करणे हाच यावर उपाय आहे. यासाठी देशातील प्रयोगशाळांचे जाळे मजबूत केलेले आहे. लसीकरणाचा वेग वाढला आहे. यामुळेच आपण पाहत आहोत की, तिसऱ्या लाटेचा फारसा प्रभाव जाणवला नाही. ओमायक्रॉनवर आपण सहज मात करू शकलो. लसीकरणाचे प्रमाण वाढल्यामुळे आपण तिसऱ्या लाटेचा समर्थपणे सामना केला आहे. 

टॅग्स :Dr Bharti Pawarडॉ. भारती पवारMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य