शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

"... म्हणून देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे", नितीन गडकरींकडून माजी पंतप्रधानांचे कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 09:20 IST

Nitin Gadkari : भारतातील गरीब लोकांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने उदार आर्थिक धोरणाची गरज आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले. मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या आर्थिक सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. आर्थिक सुधारणांसाठी देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. तसेच, भारतातील गरीब लोकांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने उदार आर्थिक धोरणाची गरज आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

टॅक्स इंडिया ऑनलाइन पोर्टल अवॉर्ड (TIOL Awards 2022) कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी, मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये अर्थमंत्री म्हणून आर्थिक सुधारणा सुरू करून भारताला नवी दिशा दिली होती. यामुळे देशात उदारमतवादी अर्थव्यवस्थेची सुरुवात झाली, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नितीन गडकरी पुढे म्हणाले की 'लिबरल अर्थव्यवस्थेमुळे (Liberal Economy) देशाला नवी दिशा मिळाली, त्यासाठी मनमोहन सिंग यांचा देश ऋणी आहे.' 

याचबरोबर, माजी पंतप्रधान सिंग यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे 1990 च्या दशकात मी महाराष्ट्रात मंत्री असताना रस्ता बांधण्यासाठी निधी उभारता आला होता, अशी आठवण नितीन गडकरी यांनी सांगितली. नितीनगडकरी म्हणाले की, उदार आर्थिक धोरण शेतकरी आणि गरीब लोकांसाठी आहे. उदारमतवादी आर्थिक धोरण कोणत्याही देशाच्या विकासात कशी मदत करू शकते, याचे चीन हे उत्तम उदाहरण आहे. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी भारताला अधिक भांडवली खर्च गुंतवणुकीची गरज आहे, असेही ते म्हणाले. 

एनएचएआय महामार्गाच्या बांधकामासाठीही सर्वसामान्यांकडून निधी गोळा करत असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच, नितीन गडकरी म्हणाले की, त्यांचे मंत्रालय 26 ग्रीन एक्स्प्रेस वे बांधत आहे आणि त्यांना निधीची कमतरता भासत नाही. त्यांच्या मते, एनएचएआयचा टोल महसूल सध्याच्या 40,000 कोटी रुपयांवरून 2024 च्या अखेरीस 1.40 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. याशिवाय, देशातील गरीब लोकांना त्यांच्या जीवनात आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने भारताला उदार आर्थिक धोरण तयार करण्याची नितांत गरज असल्याचेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीManmohan Singhमनमोहन सिंगbusinessव्यवसाय