शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांचे उद्दिष्ट फक्त...';अमित शाह यांचा विरोधकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 14:45 IST

इंडिया आघाडीवर टीका करताना अमित शाह म्हणाले की, त्यात सहभागी असलेले सर्व पक्ष घोटाळ्यांमध्ये सामील झालेले आहेत.

भाजपाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांची इंडिया आघाडी म्हणजे ७ घराणेशाही पक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांच्या पक्षात लोकशाही नाही, तर देशात लोकशाही कशी राहणार?, असा सवालही अमित शाह यांनी उपस्थित केला. 

इंडिया आघाडीवर टीका करताना अमित शाह म्हणाले की, त्यात सहभागी असलेले सर्व पक्ष घोटाळ्यांमध्ये सामील झालेले आहेत. आम आदमी पक्षानेही दिल्लीत अनेक घोटाळे केले. पांडव आणि कौरवांप्रमाणेच लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन छावण्या निर्माण झाल्या आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली पहिला कॅम्प म्हणजे एनडीए आघाडी, राष्ट्र प्रथम हा आपल्या आघाडीचा उद्देश आहे. पुढील निवडणूक विकासाची आघाडी विरुद्ध घराणेशाही आघाडी यांच्यात होणार आहे, असं अमित शाह म्हणाले.

खासदार सोनिया गांधींचे लक्ष्य राहुल गांधींना पंतप्रधान बनवणे, शरद पवारांचे लक्ष्य आपल्या मुलीला मुख्यमंत्री बनवणे, उद्धव ठाकरेंचे लक्ष्य आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवणे, लालू यादव यांचे लक्ष्य आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवणे, मुलायम सिंह यांचे उद्दिष्ट मुलाला मुख्यमंत्री बनवणे, हे आहे, असं टीका अमित शाह यांनी केले. भाजपा जर कुटुंबाभिमुख पक्ष असता तर चहा विकणाऱ्याचा मुलगा कधीच पंतप्रधान झाला नसता. लोकशाहीत सर्वांना समान संधी मिळणे महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, पुत्रांचे कल्याण हेच ध्येय असेल तर देशाचे कल्याण कसे होणार? देशातील तरुणांना विरोधी पक्षांमध्ये पुढे जाऊ दिले जात नाही, असा निशाणा अमित शाह यांनी साधला.  

या देशात 2G, 3G आणि 4G पक्ष-

अमित शाह म्हणाले, "या देशात 2G, 3G आणि 4G पक्ष आहेत. 2G म्हणजे घोटाळा नाही. 2G म्हणजे २ पिढीचा पक्ष... त्यांचा नेता ४ पिढ्यांपर्यंत बदलत नाही... कोणी पुढे सरकले तर याचा त्रास त्यांना होतो. ते भाग्य, असे नशीब भोगलेले अनेक लोक आज भाजपामध्ये सामील होत आहेत आणि लोकशाहीच्या प्रवासात सामील होत आहेत.

टॅग्स :Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी