Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ३ दिवस जम्मू काश्मीर दौऱ्यावर; सुरक्षेचा घेणार आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 09:17 AM2021-10-23T09:17:15+5:302021-10-23T09:18:23+5:30

Union Home Minister Amit Shah visit 3 days tour at Jammu Kashmir: श्रीनगरच्या १५ अतिसंवेदनशील भागात ड्रोनच्या माध्यमातून हवाई देखरेख ठेवण्यात आली आहे. या परिसरात अल्पसंख्याकांची संख्या जास्त आहे.

Union Home Minister Amit Shah on a three-day visit to Jammu and Kashmir; Security review | Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ३ दिवस जम्मू काश्मीर दौऱ्यावर; सुरक्षेचा घेणार आढावा

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ३ दिवस जम्मू काश्मीर दौऱ्यावर; सुरक्षेचा घेणार आढावा

Next

श्रीनगर – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) आज शनिवारपासून ३ दिवसांच्या जम्मू काश्मीर(Jammu Kashmir) दौऱ्यावर जात आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. अमित शाह दुपारी १२.३० वाजता सुरक्षेचा आढावा घेतील. त्याशिवाय श्रीनगर ते शारजाह विमान सेवेची सुरुवातही त्यांच्या हस्ते होणार आहे.

काश्मीरमध्ये चोख सुरक्षा बंदोबस्त

जम्मू काश्मीरमधील(Jammu Kashmir) लोकांसाठी आजचा दिवस स्पेशल आहे. अमित शाह दुपारी १२ वाजता श्रीनगरला पोहचतील. पुढील ३ दिवस काश्मीरात असतील. अमित शाह याठिकाणी सुरक्षा एजन्सीसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतील. शाह यांचा दौरा पाहता जम्मू काश्मीरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शाहांच्या विशेष दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. काश्मीर खोऱ्यात वारंवार लोकांना टार्गेट करण्यात येत आहे. कलम ३७० हटवल्यानंतर हा पहिलाच दौरा आहे.

अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी विशेष तयारी

संपूर्ण जम्मू काश्मीरात सुरक्षा यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आलं आहे. सुरक्षा दलाच्या परवानगीशिवाय याठिकाणी काहीही करणं कठीण आहे. श्रीनगरच्या १५ अतिसंवेदनशील भागात ड्रोनच्या माध्यमातून हवाई देखरेख ठेवण्यात आली आहे. या परिसरात अल्पसंख्याकांची संख्या जास्त आहे. गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा आणि खोऱ्यात अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले पाहता काश्मीरातील काही भागात इंटरनेट सेवा बंद केली आहे. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा संस्थांची बैठक होणार आहे. त्यात IB अधिकारी, CRPF, NIA अधिकारीही सहभागी असतील. सोबतच शाह पंचायत सदस्य, राजकीय कार्यकर्ते यांनाही संबोधित करतील. श्रीनगर ते शारजाह पहिल्या विमानसेवेचे उद्धाटनही करतील.

अमित शाह यांचा जम्मू काश्मीर दौरा यासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण मागील एक महिन्यापासून दहशतवाद्यांनी रणनीती बदलत सामान्य जनतेत दहशत पसरवण्यासाठी टार्गेट किलिंगचा नवा मार्ग पत्करला आहे. गेल्या १ महिन्यात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेलेत. जम्मू काश्मीरमध्ये सध्या तणावाची परिस्थिती असताना शाह यांनी कठोरता दाखवत त्यांचा दौरा करत आहेत. जम्मू काश्मीरच्या ग्राऊंड झीरोवर थेट देशाचे गृहमंत्री जात देशविरोधी कारवाया खपवून घेणार नाही असाच स्पष्ट संदेश या दौऱ्यातून दिला जाणार आहे.

Web Title: Union Home Minister Amit Shah on a three-day visit to Jammu and Kashmir; Security review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app