शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

Coronavirus: चिंतेत भर! देशात अद्याप कोरोनाची दुसरी लाट कायम; महाराष्ट्र, केरळमध्ये ५३ टक्के रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 17:49 IST

Coronavirus: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात अद्यापही कोरोनाची दुसरी लाट कायम असून, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देकोरोना नियमांचे उल्लंघन गंभीरकेरळमध्ये जाणार केंद्रीय पथकलंबडा व्हेरिएंटचा भारताला धोका नाही

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असले, तरी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात अद्यापही कोरोनाची दुसरी लाट कायम असून, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच झिका व्हायरस परिस्थितीच्या देखरेखीसाठी एक पथक केरळमध्ये जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. (union health ministry says we need to continue to take all precautions over coronavirus)

केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत असली, तरी सर्व प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. एकूण नवीन कोरोनाबाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रातील आहेत. 

हीच ती वेळ! देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता; हायकोर्टाने केले स्पष्ट

कोरोना नियमांचे उल्लंघन गंभीर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या नियमित पत्रकार परिषदेत मसुरी येथील केम्प्टी फॉल्सचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला. यासंदर्भात बोलताना कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे दिसत असून, ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याचे लव अग्रवाल यांनी यावेळी नमूद केले. तसेच बांगलादेशात तिसऱ्या लाटेचा शिरकाव झाला असून, तेथील रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेपेक्षा कमालीने वाढली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. 

केरळमध्ये जाणार केंद्रीय पथक

केरळमध्ये झिका व्हायरसचे काही रुग्ण आढळून आले असून, तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सहा सदस्यांचे एक केंद्रीय पथक केरळमध्ये दाखल होणार आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने कोरोनाच्या सातव्या व्हेरिएंट ओळख पटवली आहे. यासंदर्भात निरीक्षणे नोंदवली जात असून, नव्या व्हेरिएंटचा भारतात शिरकाव झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

देशभरातील १७ राज्यांमध्ये पेट्रोल ₹ १०० पार; ‘या’ शहरात सर्वाधिक इंधनदर

पर्यटनासह कोरोना नियम आवश्यकच

नीती आयोगातील आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले आहे की, पर्यटन, आजीविका यांसह अर्थचक्र सुरू राहणे गरजेचे आहे, तसेच कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणेही आवश्यकच आहे. कोरोना नियमांना बगल देऊन खुलेपणाने व्यवहार, वर्तन करण्याची ही योग्य वेळ नाही. तसेच गर्भवती महिलांना कोरोनाची लस देण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आल्याची माहिती पॉल यांनी यावेळी दिली. 

“डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे सिद्ध!”

लंबडा व्हेरिएंटचा भारताला धोका नाही

भारतात अद्यापतरी लंबडा या व्हेरिएंचा धोका नाही. पेरू देशात या व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मात्र, भारतात या व्हेरिएंटचा रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अजूनही काही जिल्ह्यांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. एका दिवशी ३६ ते ३८ हजार नव्या रुग्णांची नोंद होणे ही गंभीर बाब आहे. कोरोना नियमांचे पालन केले नाही, तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकेल, अशी भीती पॉल यांनी यावेळी व्यक्त केली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसKeralaकेरळCentral Governmentकेंद्र सरकार