आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक; जम्मू-काश्मीरमधील घडामोडींवर होणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 06:39 IST2019-08-05T04:14:47+5:302019-08-05T06:39:41+5:30

जम्मू आणि काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

Union Cabinet meeting today | आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक; जम्मू-काश्मीरमधील घडामोडींवर होणार चर्चा

आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक; जम्मू-काश्मीरमधील घडामोडींवर होणार चर्चा

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली येथे होत आहे.

सामान्यत: मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक बुधवारी घेतली जाते; परंतु अनियोजित अशा या बैठकीत जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न चर्चेस येण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. केंद्र सरकार काश्मीर खोऱ्यात काही ‘चुकीचे धाडस’ करील, असा विरोधकांचा समज झाला असून, जम्मू आणि काश्मीर राज्याला घटनेत असलेली हमी काढून घेतली जाऊ नये, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

Web Title: Union Cabinet meeting today