शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार; शिंदे गटाला संधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 08:26 IST

या बैठकीत भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि संघटन महासचिव बीएल संतोष यांनी भाग घेतला.

नवी दिल्ली - जानेवारी महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. हा विस्तार करण्यासाठी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी मित्रपक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ८ जानेवारीला रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठक पार पडली. 

दिर्घवेळ सुरू असलेल्या या बैठकीत भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि संघटन महासचिव बीएल संतोष यांनी भाग घेतला. सूत्रांनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीत ताकदीनं उतरण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारच नाही तर राज्य आणि केंद्रीय पक्षसंघटनेतही महत्त्वाचे बदल होणार आहेत. या बदलाची सुरुवात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापासून सुरू होईल. 

याआधी जे. पी नड्डा यांचा कार्यकाळ संपला असताना त्यांना १ वर्षाची मुदतवाढ दिली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य संघटनेत बदल, आवश्यक नेतृत्व परिवर्तन आणि केंद्रीय संघटनेत महत्त्वाच्या बदलावर शिक्कामोर्तब होईल. १५ फेब्रुवारीपर्यंत या बदलाची सुरुवात होऊ शकते. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार असेल. त्याचमुळे यावर व्यापक चर्चा होत आहे. विस्तारावेळी राज्यातील समीकरण जुळवण्यासाठी मोठे बदल केले जाऊ शकतात. त्यातून सत्तेचं राजकारण, सामाजिक समीकरण यांचा समन्वय साधला जाईल. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीनंतर पुन्हा एकदा वरिष्ठ पातळीवर चर्चाविनिमय करण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांची काळजी घेतली जाणार आहे. जेडीयू, अकाली दल, शिवसेना यासारखे पक्ष भाजपापासून दुरावल्यानंतर भाजपा मित्रपक्षांनाच संपवतं असा आरोप होतो. तो खोडून काढण्याचा प्रयत्न या विस्तारातून होणार आहे. 

महाराष्ट्रातून शिंदे गटाला मिळणार संधी?२०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाशी फारकत घेत महाविकास आघाडीत प्रवेश केला. तेव्हा एकमेव केंद्रीय मंत्री असलेले अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता शिवसेनेत २ गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाकरे गटाचे १३ खासदार सहभागी झाले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील एकाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. 

३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, संसदेच्या अधिवेशनाचा पहिला टप्पा ३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी आणि दुसरा टप्पा १३ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत चालेल. पहिल्या टप्प्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपतींच्या आभार प्रस्तावावर चर्चा होईल. दुसऱ्या टप्प्यात अर्थमंत्री सर्वसाधारण अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील. संपूर्ण अधिवेशनात २७ बैठका होणार आहेत. 

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे