शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच होणार सादर

By admin | Updated: January 23, 2017 17:10 IST

सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्याची याचिका फेटाळून लावली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्याची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्य न्यायमूर्ती जे. एस. खेहर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचुड यांनी ही याचिका फेटाळली. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यास आदर्श आचारसंहितेचा भंग होणार असल्याचं याचिकाकर्त्यांच म्हणणं आहे. मात्र 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केल्यास आचारसंहितेचा भंग होणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाचं समर्थन करताना न्यायालयानं पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यास मतदारांवर कोणताही प्रभाव पडणार नाही, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली आहे. केंद्र सरकार 2017-18 वर्षाचा अर्थसंकल्प 1 मार्च रोजी सादर करणं प्रस्तावित होते. मात्र केंद्रीय अर्थ मंत्रालयानं तो 1 फेब्रुवारीला सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पात भाजपा मतदारांना अनेक आश्वासने देऊन आकर्षिक करू शकते, तसेच तो आदर्श आचारसंहितेचा भंग होईल, असंही याचिकाकर्ते वकील एम. एल. शर्मा यांचं म्हणणं आहे. मात्र केंद्रानं 31 जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावलं असून, त्याच्या दुस-याच दिवशी केंद्र सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे.