Union Budget 2019: हवा की ओट लेकर भी चिराग जलता है..., अर्थमंत्र्यांची शायरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 03:26 IST2019-07-06T03:25:20+5:302019-07-06T03:26:00+5:30
पाच वर्षात ती वाढून २०१९ मध्ये २.७ ट्रिलियन डॉलर झाली आहे आणि आता ५ ट्रिलियन डॉलर हे लक्ष्य आहे.

Union Budget 2019: हवा की ओट लेकर भी चिराग जलता है..., अर्थमंत्र्यांची शायरी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चाणक्य नीती आणि उर्दू शायरी ऐकवित बजेटला नवे परिमाण दिले. त्या म्हणाल्या की, चाणक्य नीती सांगते, ‘कार्य पुरुषा करे, ना लक्ष्यम संपा दयाते’ म्हणजेच इच्छाशक्तीसह केलेले प्रयत्न नक्कीच लक्ष्यप्राप्तीपर्यंत पोहचतात. यासोबतच त्यांनी उर्दू शायरी ऐकविली. त्या म्हणाल्या, ‘यकीन हो तो कोई रास्ता निकलता है, हवा की ओट लेकर भी चिराग जलता है’ ही शायरी उर्दूचे प्रसिद्ध शायर मंजूर हाशमी यांची आहे. याचा अर्थ, जर आपल्याला स्वत:वर विश्वास असेल तर हवेचा सहारा घेऊनही दीवा तेवत राहतो. अर्थात, सीतारामन यांनी हे उदाहरण यासाठी दिले की, त्या अर्थव्यवस्थेच्या ५ ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य पूर्ण करण्याबाबत बोलत होत्या. त्यांनी सांगितले की, २०१४ मध्ये अर्थव्यवस्था १.८ ट्रिलियन डॉलरची होती. पाच वर्षात ती वाढून २०१९ मध्ये २.७ ट्रिलियन डॉलर झाली आहे आणि आता ५ ट्रिलियन डॉलर हे लक्ष्य आहे.