शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Union Budget 2019: 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट, अर्थसंकल्पावर मोदी खूश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 16:48 IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादर केला आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादर केला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं सर्वसमावेशक बजेट मांडल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. निर्मला सीतारामण आणि त्यांच्या टीमला चांगला बजेट सादर केल्याबद्दल शुभेच्छा देतो. 2022पर्यंत शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करण्यासाठी लाभदायी ठरणार आहे. बजेटमध्ये भावी पिढ्यांचाही विकासाची संकल्पना आहे. देशाला समृद्ध, प्रत्येकाला समर्थ बनवणारा हा बजेट आहे. या बजेटनं गरिबाला बळ मिळणार असून, तरुणांना चांगलं भविष्य मिळणार आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. पुढे मोदी म्हणतात, बजेटमधून मध्यमवर्गाची प्रगती होणार आहे. विकासाच्या प्रगतीला गती मिळणार असून, या बजेटनं टॅक्स व्यवस्थेत सुधारणा होणार आहे. हा बजेट उद्यम आणि उद्यमशील लोकांना मजबूत करणारा आहे. या बजेटमुळे देशाच्या विकासात महिलांची भागीदारी आणखी वाढणार आहे. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणार होणार आहेत. बजेटमुळे शिक्षण क्षेत्रात उत्साह वाढणार आहे.हा आर्टिफिशेल इंटेलिजन्स अन् स्पेस रिसर्चला लोकांमध्ये पोहोचवणार आहे. या बजेटमध्ये जागतिक आर्थिक सुधारणा आहेत. बजेटमध्ये गाव आणि गरिबांचं कल्याण होणार आहे. हा बजेट ग्रीन बजेट आहे. पर्यावरण, इलेक्ट्रिक मोबिलिटी, सोलारवर विशेष भर देण्यात आलं आहे. गेल्या पाच वर्षांत देशानं नैराश्याचं वातावरण मागे सोडलं आहे. देश आत्मविश्वासानं भारलेला असून, प्रगतिपथावर आहे. सामान्य माणसाच्या जीवनात नव्या आकांशा निर्माण होणार आहेत. देशाची गती योग्य असल्यानं निर्धारित लक्ष्यापर्यंत लवकरच पोहोचू. हा बजेट न्यू इंडियासाठी फायदेशीर ठरणार आहे. देशाचा मार्ग निर्धारित करण्यासाठी बजेट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. गरीब, सोशितांना सशक्त करण्यासाठी आमच्या सरकारनं पावलं उचलली आहेत. शेतकरी, वंचित, पीडितांना सशक्त करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, 5 लाख करोडची अर्थव्यवस्था करण्यासाठी हा बजेट प्रेरणादायी ठरणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Budget 2019अर्थसंकल्प 2019Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन