शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांना मिळणार १८ हजार रुपये भत्ता; ममता बॅनर्जींनी प्रसिद्ध केला जाहीरनामा, १० मोठी वचने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 08:16 IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘१० वचने’ सादर करत राज्याच्या विकासाचा पुढचा रोडमॅप मांडला आहे. यामध्ये राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दिलासा देण्यासाठी वर्षाला १८ हजार रुपये भत्ता देण्यावर भर देण्यात आला आहे.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसने शुक्रवारी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘१० वचने’ सादर करत राज्याच्या विकासाचा पुढचा रोडमॅप मांडला आहे. यामध्ये राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दिलासा देण्यासाठी वर्षाला १८ हजार रुपये भत्ता देण्यावर भर देण्यात आला आहे.

‘दुआरे चिकित्सा’, आरोग्य क्रांतीजाहीरनाम्यातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे ‘दुआरे चिकित्सा’ योजना. याअंतर्गत प्रत्येक ब्लॉक, शहरात आरोग्य शिबिरे आयोजित करून लोकांच्या घरापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवली जाणार आहे.  ‘लक्ष्मी भंडार’ योजनेच्या रक्कमेत वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार सामान्य प्रवर्गातील महिलांना दरमहा १,५०० रुपये, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील महिलांना दरमहा १,७०० रुपये मिळतील. 

हिमंता बिस्वा सरमांचा उमेदवारी अर्ज दाखलगुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी ‘जालुकबारी’ विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सलग सहाव्यांदा या मतदारसंघातून विजय मिळविण्याच्या निर्धाराने सरमा निवडणूक रिंगणात उतरले असून, अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी गुवाहाटीमध्ये भव्य रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

आईचा आशीर्वाद आणि भव्य मिरवणूकउमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मातोश्री मृणालिनी देवी यांचा आशीर्वाद घेतला. “कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आईच्या आशीर्वादानेच व्हायला हवी,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

त्यानंतर खनापाडा ते हेंगराबारी अशा सुमारे ५.६ किमी अंतराच्या भव्य मिरवणुकीत ते सहभागी झाले. मुसळधार पाऊस असूनही हजारो कार्यकर्त्यांनी या रॅलीला मोठी गर्दी केली होती. यावेळी बिहू नर्तक व पारंपरिक वाद्यांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Unemployment allowance of ₹18,000 for jobless; Mamata's manifesto, 10 promises.

Web Summary : Mamata Banerjee's manifesto promises ₹18,000 allowance for unemployed youth and doorstep healthcare. Himanta Biswa Sarma filed nomination, showcasing strength with a rally after seeking his mother's blessings. He aims for a sixth consecutive term.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल