शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

अशिक्षित नागरिक देशावरील मोठे ओझे, केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 07:41 IST

Amit Shah News: अशिक्षित लोक हे देशावरील मोठे ओझे आहे. ते कधीही चांगले नागरिक बनू शकत नाहीत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

नवी दिल्ली : अशिक्षित लोक हे देशावरील मोठे ओझे आहे. ते कधीही चांगले नागरिक बनू शकत नाहीत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले, राज्यघटनेने आपल्याला काय अधिकार दिले आहेत किंवा कोणती कर्तव्ये बजावायला सांगितली आहेत, याची अशिक्षित माणसाला काहीही कल्पना नसते. नरेंद्र मोदी हे सत्तेत आल्याच्या घटनेस २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहा यांची मुलाखत घेण्यात आली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नेते आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले, त्यावेळी गुजरातमध्ये एक मोठी समस्या होती ती म्हणजे, शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण खूपच मोठे होते. त्यावेळी आम्ही शाळेत पटनोंदणी वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जोमाने प्रयत्न केले. त्यानंतर शाळेत १०० टक्के पटनोंदणी करण्यात गुजरात सरकार यशस्वी झाले होते.अमित शहा यांनी सांगितले की, पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, त्यांच्या कारकिर्दीत राज्यातल्या शाळांत विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून १ टक्क्यावर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नेते आहेत. सध्या ज्या लोकशाही पद्धतीने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठका होतात, तशा त्या याआधी कधीही झाल्या नव्हत्या, हे मोदी यांचे टीकाकारही मान्य करतील. मोदी हे हुकूमशहा आहेत, या टीकेत काहीही तथ्य नाही.  शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मी अनेक वर्षे काम केले आहे. ते प्रत्येकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात, मोदी शिस्तप्रिय आहेत. देशात परिवर्तन घडविण्यासाठी जनतेने  सत्ता दिली आहे. फक्त सरकार चालविण्यापुरते हे अधिकार आपल्याला दिलेले नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे.  

राष्ट्रहितासाठी मोदी घेतात योग्य निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, भाजपला आवडण्याची शक्यता नाही, असेही निर्णय घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. काळा पैसा खणून काढताना, आर्थिक सुधारणा करताना, करचुकवेगिरीचे सर्व मार्ग बंद करताना काही लोकांना त्रास हा होणारच. पण त्याचा विचार न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रहितासाठी योग्य तोच निर्णय घेतात.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार