शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कमी वजनाची मुले उपेक्षित वर्गातीलच, शहरी भागातील अभ्यासाअंती निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 04:40 IST

नवी दिल्ली : शहरी भागात उंचीच्या तुलनेत कमी वजन असलेले मूल आढळले, तर ते उपेक्षित वर्गाचे असते, असा धक्कादायक निष्कर्ष नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ न्यूट्रीशनच्या अभ्यासाअंती निघाला आहे.

नवी दिल्ली : शहरी भागात उंचीच्या तुलनेत कमी वजन असलेले मूल आढळले, तर ते उपेक्षित वर्गाचे असते, असा धक्कादायक निष्कर्ष नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ न्यूट्रीशनच्या अभ्यासाअंती निघाला आहे. या संस्थेने गेल्या २६ सप्टेंबर रोजी हा अभ्यास जाहीर केला. त्यात म्हटले आहे की, अनुसूचित जाती-जमातीची पाच वर्षांच्या आतील ३२-३३ टक्के मुले कमी वजनाची आहेत. सर्वसामान्य लोकसंख्येत हेच प्रमाण २१ टक्के आहे. निरक्षर वडील असलेली पाच वर्षांच्या आतील ३६ टक्के मुले कमी वजनाची आढळली आहेत, तर महाविद्यालयीन शिक्षण झालेल्या वडिलांची १६ टक्के मुलेच कमी वजनाची होती. ५०.२ टक्के मुले व ४४.६ टक्के मुलींना स्वच्छतागृहच उपलब्ध नव्हते, तर घरांमध्ये राहणारी मुले व मुलींना स्वच्छतागृह उपलब्ध नसण्याचे प्रमाण अनुक्रमे २६ व २४ टक्के होते. बालमृत्युंपैकी ५० टक्के मृत्यूचे कारण हे कुपोषण आहे.अगदी सुरुवातीच्या वर्षांत कुपोषण असले, तर त्याचे प्रदीर्घ काळ परिणाम त्या मुलांच्या स्नायू, ज्ञानेंद्रिय, आकलन शक्ती, समाज व भावनात्मक विकासावर होतात, असे इंडिया स्पेंडने जुलै, २०१७ मध्ये म्हटले. वयानुसार उंची ही सामान्यापेक्षाही खाली असते, अशी वाढ खुंटलेली मुले आयुष्यभर शिक्षण आणि कामांची संधी गमावतात, असे एंड आॅफ चाइल्डहूड रिपोर्ट, २०१७ नावाच्या जागतिक अभ्यासात म्हटले आहे. ही मुले आजारपण किंवा रोगाला बळी पडण्याचीही जास्त शक्यता असते. परिणामी, त्यांचा त्यात मृत्यूही होऊ शकतो. दहापैकी फक्त एका मुलाचे पुरेसे पोषण होते, असे त्यात म्हटले.>असा निघाला निष्कर्षते बहुतांश वेळा ते अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीचे असते किंवा त्याचे वडील निरक्षर असतात किंवा ते कुटुंब स्वच्छतागृह नसलेल्या घरातच राहात असते. म्हणजेच अनुसूचित जाती-जमातीत जन्मलेली, वडील निरक्षर असलेली आणि घरात स्वच्छतागृहासारखी प्राथमिक सोय नसलेली मुले बहुधा कुपोषितच असतात.