सर्वसाधारणपणे दुकानातून मौल्यवान वस्तू, सोन्या-चांदीचे दागिने, एखादं महागडं उपकरण, मोबाईल फोन चोरीला गेल्याचे ऐकले असेल. मात्र काही महिलांनी एका दुकानामधून चक्क १० हजार रुपयांची अंतर्वस्त्रे चोरून नेल्याची अजब आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाराणसीमधील एका दुकानात ही अजब चोरी झाली आहे. तसेच सीसीटीव्हीमध्ये झालेल्या चित्रिकरणामुळे ही चोरी उघडकीस आली आहे. त्यानंतर दुकानदाराने या चोरीबाबत पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या चोरीचा आरोप वाराणसी महानगरपालिकेच्या माजी ब्रँड ॲम्बॅसिडर राहिलेल्या आणि वाराणसीमधील महिला व्यापार मंडळाच्या अध्यक्षा असेलल्या महिला नेत्यावर झाला आहे. तसेच त्यांचे अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबतचे फोटोही आता व्हायरल होत आहेत.
वाराणसीमधील चेतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लहुराबीर परिसरात असलेल्या दुकानात ही चोरी झाली आहे. या चोरीचं सीसीटीव्ही चित्रिकरण समोर आलं असून, त्यामध्ये एका अंतर्वस्त्रांच्या दुकानामध्ये तीन महिला फिरताना दिसत आहेत. त्या सेल्सगर्लला बोलण्यामध्ये गुंतवून काही अंतर्वस्त्रे आपल्या बॅगेत टाकताना दिसत आहेत. तसेच नंतर या महिला काहीही खरेदी न करता दुकानामधून निघून जाताना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या चोरीमध्ये वाराणसी महिला व्यापार मंडळाच्या अध्यक्षा सुनीता सोनी यासुद्धा सहभागी आसल्याचा आरोप होत आहे. तसेच त्यांच्यासोबत आलेल्या दोन महिला चोरी करताना दिसत आहेत. मात्र सुनीता यांनी चोरीचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच या प्रकरणी पोलिसांच्या तपासामध्ये पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे.
ही घटना घडली तेव्हा सुनीता सोनी यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि नणंद दुकानात आली होती. या तिघांनीही मिळून चोरी केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दुकानदार सुदीप सिंह यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. २४ फेब्रुवारी रोजी संध्याकाली तीन महिला दुकानात घुसल्या. तसेच सेल्सगर्ल सामान आणण्यासाठी गेल्यावर त्यांनी १० हजार रुपयांची अंतर्वस्त्रे आपल्या बॅगेत भरली, असे सीटीटीव्ही चित्रिकरणामध्ये स्पष्टपणे दिसत आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे.
दुसरीकडे सुनीता सोनी यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच मी जौनपूर येथून आलेल्या नातेवाईकांसोबत दुकानात गेले होते. मात्र माझ्या पाठीमागे या महिलांनी काय खरेदी केलं हे मला ठावूक नाही. मी या अंतर्वस्त्रांचं बिल देण्यासाठी दुकानदाराशी संपर्क साधत आहे, असेही त्यांनी सांगितले.
Web Summary : A former brand ambassador for Varanasi is accused of stealing ₹10,000 worth of lingerie from a store. CCTV footage allegedly shows the woman, a local leader, and two others involved. She denies the charges, claiming she'll pay the bill.
Web Summary : वाराणसी की पूर्व ब्रांड एंबेसडर पर एक दुकान से 10,000 रुपये के अंतर्वस्त्र चोरी करने का आरोप है। सीसीटीवी फुटेज में कथित तौर पर महिला, एक स्थानीय नेता और दो अन्य शामिल हैं। उसने आरोपों से इनकार किया है, और बिल का भुगतान करने का दावा किया है।