समजून घ्या ‘कोरोना’, धार्मिक स्थळी जाताना जरा जपून!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 05:05 AM2020-06-08T05:05:42+5:302020-06-08T05:06:02+5:30

राज्यात व देशात दरवर्षी गावोगावी भरणाऱ्या ग्रामदैवताच्या पूजेनिमित्त भरणाºया जत्रा या ही स्थानिक पातळीवर नागरिकांनी एकत्रित निर्णय घेऊन रद्द केलेल्या चांगल्या.

Understand ‘Corona’ while going to a religious place with a little care! | समजून घ्या ‘कोरोना’, धार्मिक स्थळी जाताना जरा जपून!

समजून घ्या ‘कोरोना’, धार्मिक स्थळी जाताना जरा जपून!

Next

लॉकडाऊन ५ मध्ये सर्वधर्मीय धार्मिक तीर्थस्थळ आणि प्रार्थनास्थळ खुली केली असली तरी काही निर्णय जनतेने स्वत: घ्यायला हवे. केंद्र सरकारने धार्मिक स्थळ व प्रार्थनास्थळ खुली करताना ६५ वर्षांवरील, १० वर्षांखालील, गर्भवती स्त्रिया, सर्व वयोगटात मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, कॅन्सर व असे मोठे आजार असलेल्यांनी धार्मिक स्थळी जाऊ नये असे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने एवढ्यांनाच सतर्क केले असले तरी लक्षणविरहीत (कुठले ही लक्षण नसलेले) कोरोनाबाधितांची संख्या पाहता आजार असो व नसो तसेच सर्वच वयोगटाच्या व्यक्तींनी धार्मिकस्थळी व प्रार्थनास्थळांना जाणे कोरोना संसर्गाची जोखीम वाढवणारा महत्त्वाचा घटक ठरू शकतो. कोरोनाच नव्हे इतर जंतुसंसर्ग पसरण्यासाठी गर्दीमुळे तीर्थस्थळे व धार्मिकस्थळे मोठे कारण ठरले आहे व कोरोनाच्या बाबतीतही हे खरे ठरू शकते.

राज्यात व देशात दरवर्षी गावोगावी भरणाऱ्या ग्रामदैवताच्या पूजेनिमित्त भरणाºया जत्रा या ही स्थानिक पातळीवर नागरिकांनी एकत्रित निर्णय घेऊन रद्द केलेल्या चांगल्या. अशा जत्रा झाल्या तरी सध्या तरी तिथे जाणे टाळावे. पुजारी किंवा त्या स्थळाची जबाबदारी असणाऱ्यांनी मास्क, फेस शिल्ड वापरावे व मुख्य देव्हारा व दर्शनच्या जागेत किमान ८ फूट अंतर ठेवावे. धार्मिक स्थळाची जबाबदारी असणाºयांना ताप, सर्दी, खोकला झाल्यास त्यांनी १४ ते २० दिवस मंदिरात इतरांच्या संपर्कात येऊ नये.
अशा ठिकाणी गर्दी खूप असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे शक्य नसे तरी हे नियम पाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा व दर्शन रांगेत ६ फुटांचे गोल आखून घ्यावे व त्यातच दर्शनासाठी आलेल्यांनी उभे राहावे. मंदिरात येताना प्रत्येकाला मास्क अनिवार्य असावा व त्याशिवाय कोणाला ही बाहेर सोडू नये. मंदिराबाहेर हात धुण्यासाठी बेसिन व लिक्विड सोप शक्यतो अ‍ॅटोमेटेड (आपोआप सोप हातावर पडेल असे सेन्सर असलेले) सोय असावी. तीर्थक्षेत्र यांच्याशी एक मोठे अर्थकारण निगडित असले व हा सगळ्यांच्याच भावनेचा प्रश्न असला तरी साथ रोखण्याच्या दृष्टीने वर्षभर तरी धार्मिक स्थळी न जाता घरच्या घरीच पूजा अर्चा केलेली योग्य ठरेल.
- अमोल अन्नदाते,
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

Web Title: Understand ‘Corona’ while going to a religious place with a little care!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.