दिल्लीतील बुरारीमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, २० जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 20:59 IST2025-01-27T20:51:04+5:302025-01-27T20:59:27+5:30
दिल्लीतील बुरारीमध्ये चार मजली बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली २० जण अडकल्याची भीती आहे.

दिल्लीतील बुरारीमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, २० जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू
दिल्लीतील बुरारी या एरियामध्ये बांधकाम सुरू असलेली चार मजली इमारत कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली २० जण अडकल्याची भीती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. पथकाने ८ जणांना वाचवले आहे.
याबाबत अग्निशमन विभागाने माहिती दिली. दिलेली माहिती अशी, सोमवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बुरारी येथील ऑस्कर शाळेजवळील जेएचपी हाऊस ही चार मजली इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. ढिगाऱ्याखाली २० जण अडकल्याची भीती आहे. आतापर्यंत पथकाने ८ जणांना वाचवले आहे आणि बाहेर काढले आहे.
जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही २५० यार्डची चार मजली इमारत होती. ही एक बांधकामाधीन इमारत होती.
अचानक बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटना समजताच परिसरातील लोकांनी बचाव सुरू केला. लगेच अग्निशमन विभाग घटनास्थळी पोहोचले. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. आतापर्यंत २० जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. इमारतीखाली नेमकी किती लोक अडकली आहेत याची माहिती समोर आलेली नाही.