Russia Ukraine War Side Effects: युक्रेनच्या युद्धाच्या झळा आपल्याला; रुपया, शेअर बाजाराची पडझड, महागाईला आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 08:00 AM2022-03-08T08:00:50+5:302022-03-08T08:01:04+5:30

कच्चे तेल पाेहोचले १४० डॉलर प्रति बॅरलवर. सोमवार भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का देणारा ठरला. अमेरिकेने रशियावर आणखी निर्बंध लादल्याने तसेच लिबियामधील २ तेल क्षेत्र बंद पडल्याने बाजारात तेल उत्पादन कमी उतरले.

Ukraine war Side Effects to you; Rupee, stock market crash, inviting inflation | Russia Ukraine War Side Effects: युक्रेनच्या युद्धाच्या झळा आपल्याला; रुपया, शेअर बाजाराची पडझड, महागाईला आमंत्रण

Russia Ukraine War Side Effects: युक्रेनच्या युद्धाच्या झळा आपल्याला; रुपया, शेअर बाजाराची पडझड, महागाईला आमंत्रण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती अनेक वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्याने महागाईत प्रचंड वाढ होण्याची भीती आहे. याचा धसका शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी घेतल्याने शेअर बाजार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दणकून आपटला.

मोठ्या घसरणीसह खुला 
झालेला शेअर बाजार दिवसभरात १,९६६.७१ अंकांनी खाली 
आला होता. मात्र, त्यानंतर त्यात काहीशी सुधारणा होत तो अखेर १,४९१ अंकांवर बंद झाला. निफ्टीही ३८२.२० अंकांनी कोसळून १५,८६३ ला बंद झाला.
सात महिन्यांची नीचांकी पातळी
मुंबई शेअर बाजार आणि निफ्टी हे घसरणीमुळे सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. गेल्या चार दिवसांत मुंबई शेअर बाजार जवळपास ६.०५ टक्क्यांनी खाली आला असून, ३,४०४.५३ अंकांनी घसरला आहे.


मोठे समभाग घसरले
ॲक्सिस बँक, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या समभागांमध्ये सर्वांत मोठी म्हणजे ७.६३ टक्क्यांची घसरण दिसून आली. केवळ भारती एअरटेल, एचसीएल टेक्नोलॉजी, टाटा स्टील आणि इन्फोसिस यांचे समभाग वाढीसह बंद झाले.

बाजारातून पैसे काढणे सुरूच
गेल्या काही महिन्यांपासून विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेत असून, शुक्रवारी तब्बल ७,६३१.०२ कोटींच्या समभागांची विक्री करण्यात आल्याची माहिती शेअर बाजाराने दिली आहे.

काय होणार परिणाम?
nसध्या बाजारात गुंतवणूक करण्याचा ओघ कमी होणार. बाजारातील अस्थिरतेमुळे नवगुंतवणूकदारांची संख्या रोडावण्याची शक्यता 
nम्युच्युअल फंडमधील गुंतवणूक थोडी कमी होईल.

खाद्यतेलाच्या दरात २८० रुपये वाढ
चैतन्य जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क : वर्धा : रशिया-युक्रेन युद्धामुळे एका दिवसात १५ किलो खाद्यतेलाच्या डब्यामागे २४० ते २८० रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना वाढत्या तेलदराचा चटका सोसावा लागणार आहे. 

n मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर स्थिर होते. मात्र, युद्धामुळे तेलाच्या किमती पुन्हा भडकल्याचे दिसते. 
n देशात दरवर्षी जवळपास २२० लाख ते २४० लाख टन तेलाचा उपयोग करण्यात येतो. एकूण लागणाऱ्या तेलापैकी ६० ते ७०% खाद्यतेलाची आयात करावी लागते. 
 

Web Title: Ukraine war Side Effects to you; Rupee, stock market crash, inviting inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.