शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

ब्रिटनची विमानसेवा ८ जानेवारीपासून सुरू होणार; सरकारनं जारी केली एसओपी

By जयदीप दाभोळकर | Published: January 02, 2021 4:15 PM

UK Flight : नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर सरकारनं भारत ब्रिटन बंद केली होती विमानसेवा

ठळक मुद्देप्रवाशांना नकारात्मक कोरोना अहवाल आणणं बंधनकारकआठवड्याला ३० उड्डाणांनाच परवानगी

सर्वप्रथम कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर ब्रिटनमध्ये काही दिवस लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. तसंच या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपली विमानसेवाही तात्पुरती स्थगित केली होती. भारतानंदेखील ब्रिटनची विमानसेवा ७ जानेवारीपर्यंत स्थगित केली होती. पण आता ८ जानेवारीपासून ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती नागरी उड्डयण मंत्रालयाकडून देण्यात आली होती. त्यानंतर आता सरकारकडून एसओपी जारी करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या एसओपीनुसार डीजीसीए केवळ मर्यादित संख्येतच विमानांना परवानगी देणार आहे. याव्यतिरिक्त दोन विमानांच्या येण्याजाण्यात एतकी वेळ ठेवण्यात येईल जेणेकरून विमानतळावर प्रवाशांची कोणतीही गर्दी होणार नाही, याचीही काळजी डीजीसीएद्वारे घेण्यात येईल. तसंच विमान सेवा देणाऱ्या कंपन्या कोणत्याही प्रवाशाला तिसऱ्या देशाच्या ट्रान्झिट एअरपोर्ट द्वारे ब्रिटनहून भारतात प्रवास करण्याला परवानगी देणार नाही याचीदेखील काळजी डीजीसीएद्वारे घेण्यात येणार असल्याचंही एसओपीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 

नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी अहवाल आवश्यकब्रिटनमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्यांच्यासोबत आरटी-पीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल आणणं अनिवार्य असणार आहे. तसंच ही चाचणी प्रवासाच्या ७२ तास आधी केलेली असावी. विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या बोर्डिंगदरम्यान सर्व प्रवाशांकडे चाचणीचे अहवाल आहेत का नाही याची तपासणी करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

आठवड्याला ३० उड्डाणांना परवानगीयापूर्वी शुक्रवारी मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी भारत ब्रिटनदरम्यान ८ जानेवारीपासून विमान सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती दिली होती. तसंच दोन्ही देशांमध्ये आठवड्याला केवळ ३० उड्डाणांना परवानगी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. २३ जानेवारीपर्यंतच हे सुरू राहणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतEnglandइंग्लंडAirportविमानतळ