"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 12:57 IST2025-10-22T12:57:12+5:302025-10-22T12:57:55+5:30
आरती सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या.

फोटो - आजतक
उज्जैनमधील पार्श्वनाथ शहरातील रहिवासी सौरभ राज सनी दररोज भगवान महाकाल यांच्या भस्म आरतीला उपस्थित राहत होते. दोन दिवसांपूर्वी ते भस्म आरतीत सहभागी होण्यासाठी महाकालेश्वर मंदिरात गेले होते. मात्र आरती सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या.
सौरभ यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. महाकालेश्वर मंदिर समितीचे सहाय्यक प्रशासक मूलचंद जुनवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाकालेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीलाही या घटनेची माहिती देण्यात आली. मंदिराने त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं.
सौरभ राज सोनी हे उज्जैनचे रहिवासी होते आणि विनायक कॅफे नावाचं रेस्टॉरंट चालवत होते. त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या स्टेटसची चर्चा रंगली आहे. मृत्यूपूर्वी पोस्ट केलेल्या शेवटच्या व्हॉट्सएप स्टेटसमध्ये त्यांनी लिहिले होतं की, " मिट्टी का शरीर है, सांसें सारी उधार हैं... दिल तो महाकाल का है, हम तो किरदार हैं."
स्टेटसमधून सौरभ यांची भक्ती पाहायला मिळत आहे. त्यांना आधीच मृत्यूची चाहूल लागली होती असं स्टेटसमुळे म्हटलं जात आहे. सौरभ राज यांच्या अचानक मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या घटनेची आणि त्यांच्या स्टेटसची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.