शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

'बाबा! तुम्ही स्ट्रॉंग आहात, कोरोनाला हरवूनच यायचं', मृत्यूपूर्वी लेकीनं पोलीस बाबांकडून घेतलं होत वचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 18:01 IST

संबंधित अधिकाऱ्याने सोमवारी रात्री 9.12 वाजण्याच्या सुमारास व्हिडिओ कॉलवरून कुटुंबीयांशी संवाद साधला होता, असे डॉक्टर सुमित ठक्कर यांनी सांगितले. या व्हिडिओ कॉल नंतर, संबंधित अधिकाऱ्याच्या पत्नीने डॉक्टरांना मेसेजही केला होता.

ठळक मुद्देसंबंधित अधिकाऱ्याने सोमवारी रात्री 9.12 वाजण्याच्या सुमारास व्हिडिओ कॉलवरून कुटुंबीयांशी संवाद साधला होताव्हिडिओ कॉल नंतर, संबंधित अधिकाऱ्याच्या पत्नीने डॉक्टरांना मेसेजही केला होता.यापूर्वी शनिवारीही इंदूरमध्ये कोरोनाशी लढताना एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. 

उज्जैन : कोरोना दिवसेंदिवस संपूर्ण देशात हात-पाय पसरत चालला आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीस कर्माचारीही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. उज्जैन येथील नीलगंगा पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या एका 59 वर्षीय अधिकाऱ्याचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर इंदूर येथे उपचार सुरू होते. दुपारी इंदूर येथील रामबाग मुक्तिधाम येथे राजकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलीही उपस्थित होत्या. यावेळी एक मुलगी त्यांच्या फोटोला बिलगून ढायमोकळून रडत होती.

संबंधित अधिकाऱ्याने सोमवारी रात्री 9.12 वाजण्याच्या सुमारास व्हिडिओ कॉलवरून कुटुंबीयांशी संवाद साधला होता, असे डॉक्टर सुमित ठक्कर यांनी सांगितले. या व्हिडिओ कॉलनंतर, संबंधित अधिकाऱ्याच्या पत्नीने डॉक्टरांना मेसेज केला होता, की "डॉक्टर तुमचे खूप-खूप आभार... तुम्ही त्यांची काळजी घ्या... प्लीज सर... केवळ तुमच्याकडूनच आम्हाला आशा आहे... धन्यवाद". या व्हिडिओ कॉलवर त्यांची मुलगीही बोलली होती. तेव्हा त्यांनी हातानेच इशारा करत 'मी बरा आहे', असे म्हटले होते. 

असा होता संबंधित अधिकाऱ्याचा कुटुंबीयांशी अखेरचा संवाद -

मुलगी- बाबा तुम्ही कसे आहात?

आधिकारी हातानेच इशारा करत-खुप छान

मुलगी - बाबा, तुम्ही तर खूप स्ट्रॉंग आहात. तुम्ही आमचा आत्मविश्वास वाढवता. तुम्ही नक्कीच कोरोनाचा पराभव कराल. 

अधिकारी मुलींना हातवारे करूनच हिम्मत ठेवायला सांगतात

मुलगी - बाबा, तुम्ही लवकर घरी याल ना?

पत्नी - बघा, आम्ही सगळे जण तुमची वाट बघत आहोत. लवकर घरी यावेच लागेल.

यानंतर संबंधित अधिकारी दोघींनाही आपल्या जवळ येण्याचा इशारा करतात.  

कुटुंबीयांशी बोलल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी विश्रांती केली. यानंर मंगळवारी पहाटे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा  मृत्यू झाला. यापूर्वी शनिवारीही इंदूरमध्ये कोरोनाशी लढताना एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसIndiaभारतDeathमृत्यू