ujjain kanpur encounter watch video is up most wanted criminal vikas dubey | VIDEO : ...अन् तो पोलिसांसमोर ओरडला, "मैं ही हूँ विकास दुबे कानपूर वाला"

VIDEO : ...अन् तो पोलिसांसमोर ओरडला, "मैं ही हूँ विकास दुबे कानपूर वाला"

भोपाळः उत्तर प्रदेशमधला मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार विकास दुबे याला मध्य प्रदेशमधल्या उज्जैन येथे अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस विकास दुबेच्या मागावर होते. विकास दुबेला उज्जैनमधल्या फ्रीगंज पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तत्पूर्वी विकास दुबेनं फिल्मी स्टाइल आत्मसमर्पण केलं. उज्जैनच्या महाकाल मंदिर संकुलापर्यंत २५० रुपयांचं तिकीट घेऊन तीन साथीदारांसह विकास दुबे दर्शनाच्या प्रतीक्षेत होता. तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षाकाला संशय आला, त्यानं विकास दुबेची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला पोलिसांकडे सुपूर्त केले. पोलिसांसमोरच त्यानं  मोठमोठ्यानं ओरडून सांगितलं की, मीच कानपूरवाला विकास दुबे आहे. त्याला ताबडतोब मंदिराच्या आवारात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी पकडले आणि पोलिसांना कळविले.

विकास दुबे उज्जैनच्या तिवारी नावाच्या व्यक्तीशी संपर्कात होता. तिवारीमार्गेच त्यानं उज्जैन गाठले होते. अटकेनंतर यूपी पोलिसांना त्याविषयी माहिती देण्यात आली. त्याच्या अटकेचा फोटो यूपी पोलिसांनाही पाठविण्यात आला आणि त्यानंतर हाच विकास दुबे असल्याची खात्री पटली.उज्जैनपर्यंत विकास कसा पोहोचला?
बुधवारी फरीदाबाद आणि एनसीआरमध्ये लोकेशन सापडल्यानंतर तो उज्जैनला कसा पोहोचला हा एक मोठा प्रश्न आहे. मात्र, आता उज्जैन पोलीस त्याच्याकडे चौकशी करीत आहेत. यूपी पोलीस येताच त्याच्या ट्रान्झिस्ट रिमांडसाठी कारवाई केली जाईल. तो अल्पावधीतच उज्जैनमध्ये कसा पोहोचला याचा पोलीस लवकरच उलगडा करतील. 

यूपी एसटीएफने गुरुवारी विकास दुबेच्या आणखी दोन जवळच्या साथीदारांना केले  ठार
कानपूर प्रकरणातील मुख्य सूत्रधार विकास दुबे याच्या साथीदारांचा पोलिसांनी एकामागून एक  खात्मा केला आहे. यूपी एसटीएफने गुरुवारी आठ पोलिसांच्या शहीद प्रकरणातील आरोपी विकास दुबे याच्या आणखी दोन निकटवर्तीयांना ठार केले. कानपूरमध्ये एसटीएफची पिस्तूल हिसकावणारा प्रभात मिश्रा उर्फ ​​कार्तिकेय याला पोलिसांनी ठार केले, तर इटावा येथे पोलिसांनी प्रवीण उर्फ ​​बव्वन दुबेला चकमकीत ठार मारले. बव्वनवर 50 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते आणि त्याच्याविरुद्ध चौबेपूर पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा

नियम बदलले! फक्त ७ रुपये गुंतवून मिळवा ६० हजारांची पेन्शन; २.२८ कोटी लोकांना फायदा

मोठी बातमी! आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला अटक

रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, पीयूष गोयल यांची मोठी घोषणा

तैवान, जपाननंतर आता व्हिएतनामला चिथावतोय चीन; वादग्रस्त भागात पाठवल्या युद्धनौका

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ujjain kanpur encounter watch video is up most wanted criminal vikas dubey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.