पंतप्रधान मोदींच्या घरावर UFO च्या घिरट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 12:09 IST2018-06-14T12:04:31+5:302018-06-14T12:09:23+5:30

व्हीआयपी परिसरात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना UFO सदृश वस्तू दिसली.

UFO sighted near PM Modi house on June 7 search finds nothing | पंतप्रधान मोदींच्या घरावर UFO च्या घिरट्या

पंतप्रधान मोदींच्या घरावर UFO च्या घिरट्या

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग या निवासस्थानाच्या वरती काही दिवसांपूर्वी UFO (अनआयडेन्टिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट) घिरट्या घालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या २ किमी क्षेत्र हे 'नो फ्लाय झोन'मध्ये येते. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आली नसून ही वस्तू ड्रोन असण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त करत अधिक माहिती देण्यास नकार दिला.

प्राथमिक माहितीनुसार, 7 जून रोजी संध्याकाळी 7.30 वाजता पंतप्रधान निवासाच्या व्हीआयपी परिसरात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना उडती तबकडी दिसली. त्यानंतर तातडीने शोध मोहीम हाती घेण्यात आली. नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती देण्यात आली. परंतु, UFO चा पत्ता लागू शकला नाही. त्यानंतर वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांकडून परिस्थिती ठीक असल्याचा अहवाल पोलिसांना देण्यात आला. 

याविषयी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अशाप्रकारची घटना घडल्याचे कबूल केले. मात्र, याबद्दल अधिक माहिती देण्यास नकार दिला. याठिकाणी UFO घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले, परंतु त्यामुळे कोणतीही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली नव्हती. सुरक्षेच्या कारणास्तव यापेक्षा अधिक माहिती देता येणार नाही, असे दिल्ली पोलीस दलाचे मुख्य प्रवक्ते दिपेंद्र पाठक यांनी सांगितले. 

Web Title: UFO sighted near PM Modi house on June 7 search finds nothing