शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

No Confidence Motion: अविश्वास प्रस्तावावर शिवसेना काय करणार?, उद्धव ठाकरे ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 17:56 IST

शुक्रवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा

मुंबई: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच टीडीपीनं मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला. या ठरावावर शिवसेनेची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. याबद्दलचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबद्दल शिवसेना खासदारांना बोलण्यास मनाई करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. टीडीपीच्या खासदारांनी आज लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावाला काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. या प्रस्तावाला पन्नासहून अधिक खासदारांचा पाठिंबा असल्यानं लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करुन घेतला. या प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा होणार आहे. मोदी सरकारविरोधात पहिल्यांदाच अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानं शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. लोकसभेतील भाजपाचं संख्याबळ पाहता मोदी सरकारसाठी ही लढाई लुटूपुटूची असेल. भाजपाचे लोकसभेत 273 खासदार आहेत. मित्रपक्षांच्या खासदारांचा आकडा विचारात घेतल्यास ही संख्या 310 वर जाते.एनडीएचे सध्या लोकसभेत 310 खासदार आहेत. यात शिवसेनेच्या 18 खासदारांचा समावेश आहेत. मोदी सरकारविरोधातील एकजूट दाखवण्यासाठी विरोधी पक्ष अविश्वास प्रस्तावाचा वापर करत आहेत. मोदी सरकारसाठी ही लढाई सोपी असली, तरी विरोधकांना यानिमित्तानं आपल्या एकीचं बळ दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे भाजपावर कायम टीका करणाऱ्या आणि सत्तेत राहूनही सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला आपल्या बाजूनं ओढण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल. त्यामुळे कायम मोदी सरकारवर टीका करणारी शिवसेना शुक्रवारी काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.  

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNarendra Modiनरेंद्र मोदी