शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

NDAच्या डिनरला उद्धव ठाकरे नाहीत; चर्चेला उधाण, पण खरं कारण वेगळंच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 11:34 IST

निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधीच भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी बोलावलेल्या एनडीएतील मित्रपक्षांच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आहे आहे.

मुंबई - एक्झिट पोलच्या अंदाजांनी एनडीएच्या बाजूने कौल दिल्याने लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वीच भाजपा आणि मित्रपक्षांच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे  निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधीच भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी एनडीएतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री एनडीएचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या बैठकीला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आहे आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीमागे खरे कारण वेगळेच असल्याचे समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबीयांसह परदेश दौऱ्यावर गेले होते. ते आज मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे ते अमित शहा यांनी आज बोलावलेल्या भाजपाच्या मित्रपक्षांच्या बैठकीस उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामागे कुठलीही नाराजी नाही. सध्या शिवसेनेचे काही नेते आपापल्या मतदारसंघात व्यस्त आहेत, तरीही काही नेते पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी स्पष्ट केले. 

 एनडीएची बैठक आणि नंतर होणाऱ्या डिनरला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार असल्याचे वृत्त आल्याने तसेच तसेच या बैठकीला उपस्थित राहण्याबाबतची सूचनाही शिवसेनेच्या अन्य नेत्यांना देण्यात आलेली नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र शिवसेनेतील सूत्रांनी याबाबत स्पष्टीकरण देऊन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.  एनडीएमध्ये भाजपनंतर शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. २०१४ मध्ये शिवसेनेने भाजपसोबत मिळून १८ जागांवर विजय मिळवला होता. यावेळीही भाजपाचे बहुमत हुकल्यास सत्तास्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधीच भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी एनडीएच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीनंतर डीनर पार्टी होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत.  ही बैठक संध्याकाळी ७ वाजता अशोका हॉटेलमध्ये सुरू होणार आहे. यावेळी सर्वांना डीनर देण्यात येणार असून बैठकीला २९ नेत्यांना बोलविण्यात आले आहे. या बैठकीपूर्वी ४ वाजता भाजप मुख्यालयात मंत्री परिषदेच्या सदस्यांसमवेत पीएम मोदी आणि अमित शाह बैठक घेणार आहेत.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmit Shahअमित शहाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019