UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 11:47 IST2025-06-20T11:45:19+5:302025-06-20T11:47:09+5:30

UCO Bank Fraud Case: युको बँक फसवणूक प्रकरणातून व्यावसायिक अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास विशेष सीबीआय न्यायालयाने नकार दिला.

UCO Bank Fraud Case: CBI court refuses to discharge Topworth director Abhay Lodha | UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!

UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : युको बँक फसवणूक प्रकरणातून व्यावसायिक अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास विशेष सीबीआय न्यायालयाने नकार दिला. या गुन्ह्यात लोढा यांचा ‘सक्रिय सहभाग’ असल्याचे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदविले.

टॉपवर्थ स्टील्स अँड पॉवर प्रा. लि आणि टॉपवर्थ ग्रुपचे प्रवर्तक आणि एमडी असलेल्या लोढा यांनी सहआरोपी व बँकेच्या अधिकाऱ्यांसह युको बँकेची ७४.८२ कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा कट रचला होता, असा आरोप सीबीआयने केला आहे.

गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयाचे न्या. व्ही. पी. देसाई यांनी लोढा यांचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला. त्यावेळी न्यायालयाने म्हटले की, ‘लोढा हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांच्या सहभागाशिवाय हा गुन्हा घडणे शक्य नाही.’ तर, गुन्ह्याच्या सर्व टप्प्यांवर लोढा यांचा सक्रिय सहभाग असल्याचे दिसते,  असे मंगळवारी उपलब्ध झालेल्या आदेशाच्या प्रतीमध्ये नमूद केले आहे.

सीबीआयने २०१८ मध्ये लोढा आणि अक्षता मर्केंटाईल प्रा.लि. या फर्मच्या पदाधिकाऱ्यांसह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल केला. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, टॉपवर्थ ग्रुप कंपनी व  ‘एएमपीएल’ने ७४.८२ कोटी रुपये अन्य कंपन्यांकडे वळविले. त्यातील ४३ लाख रुपये अभय लोढा व अश्विनी लोढा यांच्या नावे असलेल्या गृहकर्जाचा हप्ता फेडण्यासाठी वापरण्यात आले.

Web Title: UCO Bank Fraud Case: CBI court refuses to discharge Topworth director Abhay Lodha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.