शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

Kerala floods : यूएईच्या मदतीवरुन भाजपाचा डाव्या सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 09:42 IST

केरळमधील पूरग्रस्तांना संयुक्त अरब अमिराती (युएई)च्या 700 कोटींच्या मदत जाहीर करण्यात आली नसल्याचा खुलासा यूएईचे राजदूत अहमद अलबन्ना यांनी केला. यावरुन भाजपाने केरळमधील डाव्या सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली : केरळमधील पूरग्रस्तांना संयुक्त अरब अमिराती (युएई)च्या 700 कोटींच्या मदत जाहीर करण्यात आली नसल्याचा खुलासा यूएईचे राजदूत अहमद अलबन्ना यांनी केला. यावरुन भाजपाने केरळमधील डाव्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशाला बदनाम करण्यासाठी केरळमधील डाव्या सरकारने यूएईकडून मदत मिळाल्याचे सांगितले, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.

याप्रकरणी भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले आहे. ही एक त्रासदायक बाब आहे. कम्युनिस्ट-इस्लामिक मिळून एका दुस-या देशाकडून मिळणा-या मदतीवर खूश आहेत. जी मदतच दिली नाही. दुसरीकडे सेवा भारती सारख्या संघटनांकडून मिळणारी मदत नाकारली जात आहे. कारण, त्यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत, असे भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, केरळमधील पूरग्रस्तांना परदेशातील मदत घेणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. यानंतर ज्या यूएईकडून 700 कोटींच्या मदतीवरून देशात गदारोळ माजला त्या मदतीबाबत मोठा खुलासा करण्यात आला. भारतात अशा मदतीवर वादविवाद उत्पन्न झाले जी कधी जाहीर केली गेली नाही, असे स्पष्टीकरण युएईचे राजदूत अहमद अलबन्ना यांनी दिले. अलबन्ना यांनी केरळला मदत मिळेल, मात्र 700 कोटींचा आकडा अधिकृत जाहीर झालेला नाही. यूएईकडून किती मदत मिळेल याबाबत अद्याप ठरलेले नाही. केरळमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. त्यांचे काम अद्याप सुरु आहे. केरळमधील बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी निधी जमविण्याचे कामही सुरु आहे, असे सांगितले. 

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरBJPभाजपा